कोकीटकर कुटुंबियांने केले ब्रेन ट्यूमर मुळे दृष्टी गमवालेल्या जिजाला मदत करण्याचे आवाहन
By : Polticalface Team ,18-05-2023
चंदगड:
गजानन शिवाजी कोकितकर व त्यांची मिसेस रूपाली गजानन कोकितकर मुक्काम गुडेवाडी तालुका चंदगड यांनी ब्रेन ट्यूमर च्या शास्त्रक्रियेमुळे दृष्टी गमवालेल्या जिजाची भेट घेऊन थोडी मदत करून धीर देत एक सामाजिक बांधिलकी जपली, तसेच त्यांनी सर्वाना मदत करण्याचे आव्हान केले, नियतीने सुखी संसारात बाधा आणली आशा गरजू लोकांना आपण माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत करावी व आपल्या हातून काही पुण्य कमवावे.
जिजा काजू फॅक्टरीमध्ये कामाला जात होती. मोलमजुरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती तिचा सुखाचा संसार चालला होता पण अचानक तिच्यावर ब्रेन ट्यूमरचे संकट ओढवले तिच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आणि माहेरील परिस्थिती पण जास्त चांगली नव्हती, सासू सासरे पण नाहीत तिला 2 मुले आहेत एक 13 वर्षाची मुलगी व दहा वर्षाचा मुलगा अशा परिस्थितीत तिच्या डोक्यावरील ट्युमरचे अपरेशन झाले. मात्र या दरम्यान तीची दृष्टी गेली दोन्ही डोळ्यांनी दिलायचे बंद झाले.
जिजा बोकडे मुक्काम करे कुंडी तालुका चंदगड ही गरीब महिला दोन मुलासहित आपल्या घरी राहते आजारामध्ये तिचे दोन्ही डोळ्यांना काही दिसत नाही समाजातील सुशिक्षित घटकांना माझी नम्र विनंती आहे अशा गरीब रंजल्या गांजल्यांना तुम्ही मदत करावी हे टेटस लावायचे एकच कारण आहे तुम्ही हे स्टेटस बघून अशा समाजातील घटकांना मदत करावी मी टेटस लावायचा एकच उद्देश आहे की असे गरीब ज्या परिस्थितीशी झगडत आहेत अशांना तुम्ही मदत करावी असे टेटस लावून मी किंवा माझे कोकितकर कुटुंबियांना कोणताही मोठेपणा मिळवायचा नाही आहे आम्ही मदत केली असे दाखवायचे नाही आहे फक्त स्वच्छ एक एकच निर्मळ भावना आहे की अशा घटकांना तुम्हीही मदत करा