राजघराण्यांसह सरदार व मावळ्यांच्या वंशजाकडून शंभुछत्रपतींना पारंपारिक शस्त्र मानवंदना

By : Polticalface Team ,18-05-2023

राजघराण्यांसह सरदार व मावळ्यांच्या वंशजाकडून शंभुछत्रपतींना पारंपारिक शस्त्र मानवंदना पुणे (प्रतिनिधी): विश्व हिंदू मराठा संघ व समस्त शिव- शंभुभक्तांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर तारखेनुसार आयोजित केलेल्या शंभूछत्रपतींच्या जन्मोत्सवा निमित्त थोर शूरवीर राजघराणे, सरदार व मावळ्यांच्या वंशजांकडून महाआरती करून महाराजांना पारंपरिक पद्धतीने शस्त्र मानवंदना देण्यात आली.

१४ मे २०२३ रोजी अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत असताना जगातील पहिल्या, डेक्कन पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकावर विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात शंभूजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारताचे पहिले पेरोऑलम्पिक जलतरण सुवर्णपदक विजेते, माजी सैनिक, पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर, पुण्याचे पालकमंत्री आमदार मा. चंद्रकांत पाटील , ऐतिहासिक राजघराणे प्रतिनिधी म्हणून महाराणी येसूबाई यांच्या राजेशिर्के घराण्याचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे शिर्के यांच्याह शुरवीर सरदार व मावळ्यांच्या वंशज घराण्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

तसेच पारंपरिक पद्धतीने शस्त्र मानवंदना देताना स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के , सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे निर्माते व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सरसेनापती संदीप मोहिते, सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज सरदार मंगेश शिळीमकर, वीर धाराऊ माता गाडे पाटील यांचे पुत्र सरनौबत अंतोजजी गाडे पाटील यांचे वंशज अमितजी गाडे, विश्वातील सर्वात मोठ्या रथयात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष गायकवाड घराण्याचे वंशज अमित गायकवाड, सरदार झुंजारराव मरळ यांचे वंशज प्रदीप मरळ, सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज सरदार आबासाहेब गोळे आदी वंशज मंडळी उपस्थित होते.

आयोजकांनी प्रमुख वंशज मान्यवरांचा शंभुप्रतिमा असलेले गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले. कार्यक्रम यशस्वीते साठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रमुख अंगरक्षक कृष्णाजी उर्फ बंकी गायकवाड यांचे वंशज विश्व हिंदू मराठा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पै.भूषण वर्पे, उपाध्यक्ष पै. वैभव दिघे, सचिव श्री. गौरव धावडे, खजिनदार श्री. महेश रणदिवे, श्री.गणेश चोरघे, पै. करण वाकोडे व सौ.पुजाताई फडके यांचे योगदान लाभले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष