करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्याची अखेर लागली निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात मात्र बागल कुटुंब नाही

By : Polticalface Team ,19-05-2023

करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्याची अखेर लागली निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात मात्र बागल कुटुंब नाही जेऊर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाची समजली जाणारी सहकारी संस्था मकाई सहकारी साखर कारखान्याच्या येत्या 16 जून रोजी होऊ पाहणाऱ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत आज अखेर एकूण 71 उमेदवारी अर्ज आले आहे या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरला असून यामध्ये मोहिते पाटील गट व माजी आमदार नारायण (आबा) पाटील समर्थक पश्चिम भागातील माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लढवण्यासाठी १६ उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली. सदर ईच्छुकानी आज (गुरुवारी) १६ अर्ज खरेदी केले करुन जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या भेटीनंतरच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. ऐनवेळी मोहिते पाटील गटाने मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतल्याने सदरची निवडणूक भलतीच रंगतदार होणार आहे यापूर्वी प्राध्यापक रामदास झोळ यांनीही या निवडणुकीकरिता आपल्या पॅनलची जुळवा जुळवा केली असल्याचे समजते मात्र अद्याप पर्यंत त्यांना म्हणावे तसे उमेदवार मिळाले नाहीत व त्यांच्या मागे फारसे जनमत सुद्धा नसल्याचे बोलले जात आहे. वाशिंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वतः रामदास झोळ हे निवडणुक रिंगणात असताना ते मतांच्या बाबतीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. यामुळे त्यांना आता इतर भागातील उमेदवार शोधताना कार्यकर्त्याची जुळवा जुळवा करता आली नसल्याचे समजते आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आ. रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण 16 उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी ही आपले उमेदवारी अर्ज भरले आहे उमेदवार अर्जाची छाननी दिनांक 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येणार आहे जे उमेदवारी अर्ज ग्राह्य होतील त्यांची यादी 22 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 22 मे 2023 ते 5 जून 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून तदनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे यापूर्वी मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी यापूर्वी 23 अर्ज दाखल झाले आहे एकंदर पाहता मकाई साखर कारखान्याच्या सत्ताधारी बागल गटाच्या विरोधात आता मोहिते पाटील गट तसेच झोळ-डांगे यांचा मकाई बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे चौकट घेणे मकाईच्या निवडणुकीत सत्ताधारी बागल कुटुंब मात्र अलिप्त करमाळा तालुक्यातील श्री मकाई साखर कारखान्यावर स्थापनेपासून आजपर्यंत बागल गटाची एक हाती सत्ता होती बागल गटाचे प्रमुख तसेच सर्वेसर्वा मा. सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल हे स्वतः कारखान्याचे चेअरमन होते त्यांच्या नंतर त्यांची कन्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल कोलते व चिरंजीव दिग्विजय बागल उर्फ प्रिन्स यांनी अध्यक्षपद भूषवले होते मात्र सध्याच्या येऊ पाहणाऱ्या मकाईच्या निवडणुकीत मात्र बागल कुटुंबांना उमेदवारी पासून अलिप्त राहण्याची वेळ आली आहे मकाई सहकारी साखर कारखाना बागल गटाच्या ताब्यात असूनही आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील बागल कुटुंबातील एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी बागल यांच्यावर सहकारी संस्थांमध्ये कर्ज प्रकरणावरून विरोधकांनी बागल यांच्यावर आक्षेप घेतला होता त्यामुळेच की काय बागल कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे समजते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष