पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात नेत्र दीपक काम केले- नियोजन अधिकारी पी डी मोरे, मुळा एज्युकेशन सोसायटीकडून पत्रकार कुरुमकर यांचा गुणगौरव

By : Polticalface Team ,21-05-2023

पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात नेत्र दीपक काम केले- नियोजन अधिकारी पी डी मोरे, मुळा एज्युकेशन सोसायटीकडून पत्रकार कुरुमकर यांचा गुणगौरव लिंपणगाव (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पुरोगामी शिक्षकेतर महासंघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात दिशादर्शक असे नेत्रदीपक काम करत संघटनात्मक दृष्ट्या अनेक प्रश्न मार्गी लावले एक सच्चा मित्र व संघटनेला एक दिशादर्शक नेतृत्व लाभल्याचे गौरवोद्गार सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे नियोजन अधिकारी पी डी मोरे यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व नंदकुमार कुरुमकर यांनी शिर्डी येथील साई दर्शन व शनिशिंगणापूर येथील शनैश्वर महाराजांचे साप्ताननिक दर्शन घेतले. यावेळी शिर्डी येथील साईनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कुलकर्णी व राज्य पुरोगामी शिक्षकेतर महासंघाचे उपाध्यक्ष राज मंहम्मद पठाण आदींनी पत्रकार कुरुमकर यांचे स्वागत करून सलमान केला. त्यानंतर शनिशिंगणापूर येथील शनैश्वर महाराजांचे दर्शन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीला सदिच्छा भेट दिली. तेथेही एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री विनायक देशमुख, संस्थेचे अधीक्षक श्री जे बी घुले, व नियोजन अधिकारी पी डी मोरे आदींनी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना यशवंतराव गडाख साहेबांनी लिहिलेले "अर्धविराम" कादंबरी पुस्तक देऊन समवेत उपस्थितीत कुरुमकर कुटुंबीयांचे स्वागत करून सन्मान केला.

याप्रसंगी सोसायटीचे सहसचिव श्री विनायक देशमुख यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीची शैक्षणिक कार्याविषयी सविस्तर माहिती देऊन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांनी नेवासा तालुक्यात सहकार सिंचन व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान. संघर्ष व त्याग त्यातून झालेला तालुक्याचा सर्वांगीण विकास याबाबत गडाख कुटुंबीय यांनी राज्यात नेत्र दीपक असे प्रेरणादायी काम केल्याचे सांगितले.

याप्रसंगी सत्कार प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यावेळी म्हणाले की, मुळा एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. या एज्युकेशन सोसायटीतून असंख्य विद्यार्थ्यांनी पदवी व पदवीतर शिक्षण घेतल्यानंतर अनेक उच्च पदस्थ अधिकारी व उद्योजक बनले आहेत. सहकाराच्या माध्यमातून नेवासा तालुका त्यांनी सर्वच क्षेत्रात सुजलाम सुफलम केला. खासदार असताना नगर दक्षिणमध्ये यशवंतराव गडाख साहेबांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्ह्यात आदर्शवत असे काम केले. जिल्ह्यात सर्वच नेत्यांची त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. राज्यात धुरंदर नेत्यांमध्ये गडाख साहेबांचा नेहमीच आवर्जून उल्लेख केला जातो. जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव गडाख साहेबांचे मोठे योगदान लाभले. सुसंस्कृत, शिस्तप्रिय, लेखक म्हणूनही त्यांचा राज्यामध्ये नावलौकिक आहे. राज्यात सहकार, सिंचन व सांस्कृतिक क्षेत्रात दिशा देण्याचे मौलिक कामही त्यांनी केले. अशा या जिल्ह्याच्या थोर नेत्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे. अशी प्रार्थना देखील पत्रकार कुरुमकर यांनी शनैश्वर महाराजांना यावेळी केली. याप्रसंगी सदिच्छा भेटी दरम्यान आभार एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव विनायक देशमुख यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.