जीवन हे क्षणभंगुर आहे, प्रत्येकाने जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यावा- ज्येष्ठ योगाचार्य अशोक देशमुख, डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,21-05-2023

जीवन हे क्षणभंगुर आहे, प्रत्येकाने जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यावा- ज्येष्ठ योगाचार्य अशोक देशमुख,

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न 
    लिंपणगाव( प्रतिनिधी)- जीवन हे क्षणभंगुर आहे, प्रत्येकाने जीवन जगत असताना मनसोक्त आनंद घ्यावा एवढेच नव्हे तर दुसऱ्याच्या आनंदात देखील नेहमी सहभागी व्हावे, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ योगाचार्य अशोक देशमुख यांनी पारगाव सुद्रिक येथे आयोजित विद्यार्थी स्नेह मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात सन २००१- 2002 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बबनराव गोरे हे होते. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचार्य देशमुख पुढे म्हणाले की, जीवनामध्ये आयुष्य वाढवायचे असेल तर नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, कपालभारती सारखे ओंकार जप इत्यादी बाबी दैनंदिन जीवनामध्ये ठेवल्यास शरीर तंदुरुस्त राहते. असे सांगून श्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय व कौटुंबिक जीवनातील हट्टाहासपणा मनसोक्तपणे हास्यविनोद करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंत शालेय शिक्षण घेत असताना एकमेकांविषयी 21 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत ज्ञानदान करणाऱ्या त्या काळच्या शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान, संस्कार, शिस्त यामुळेच आम्ही विविध उच्च पदावर जाऊन विविध क्षेत्रात भरारी घेऊ शकलो, असा सूर उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी भावनिक दृष्ट्या व्यक्त केला.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र हिरवे, माजी मुख्याध्यापक बीबी गोरे, उपशिक्षक मच्छिंद्र मडके पाटील, बाबासाहेब लष्कर, दिगंबर पुराणे, जनार्दन जायकर यांच्यासह उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधत आठवणींना उजाळा दिला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर यावेळी म्हणाल्या की, व्यक्ती कितीही मोठा झाला तरी लहानपणीच्या आठवणी समोर आल्याशिवाय राहत नाही. सहकार महर्षी व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रीगोंदा तालुक्यात खेडोपाडी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उभे करून सर्वसामान्यांच्या मुला मुलींना गावातच शिक्षणाची दारे उभारली. त्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला. अनेक विद्यार्थी आज सहकार महर्षी बापूंच्या दूरदृष्टीमुळेच विविध क्षेत्रासह उच्च पदस्थ अधिकारी बनले आहेत. याचे श्रेय सर्वश्री बापूंना जाते. असे सांगून श्रीमती दरेकर पुढे म्हणाले की, बापूंनी उभारलेल्या या महान शैक्षणिक कार्यातून आपण कधीही उतराई करू शकत नाही, असे सांगून त्या आणखी पुढे म्हणाल्या की स्नेहमेळाव्यात रामकृष्ण जगताप हे माजी विद्यार्थी गटविकास अधिकारी या पदावर पाहून मन भरून आले. आपण विद्यार्थी हेच दैवत मानून ज्ञानदानाचे प्रामाणिकपणे काम केले. पारगावकरांनी भरभरून आमच्यावर प्रेम व्यक्त केले. आम्ही देखील प्रामाणिकपणाने ज्ञानदानाचे काम केले विद्यार्थ्यांनी देखील ज्या विद्यालयात शिक्षण घेतले तेथे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा अशी अपेक्षा श्रीमती दरेकर यांनी यावेळी व्यक्त करून विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

या स्नेह मेळाव्यास उपशिक्षिका शारदा लोंढे, श्रीमती सविता शितोळे, प्रमिला बोडखे, कैलास जगताप, सुभाष मोहिते, बापू फराटे, दत्तात्रय नलगे, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, दिलीप घोडके आदी उपस्थित होते.
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक व आभार रामकृष्ण जगताप यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी