सहकार महर्षी बापूंनी सत्तेपेक्षा समाज सेवेला अधिक प्राधान्य दिले युवा नेते दिग्विजय नागवडे

By : Polticalface Team ,24-05-2023

सहकार महर्षी बापूंनी सत्तेपेक्षा समाज सेवेला अधिक प्राधान्य दिले युवा नेते दिग्विजय नागवडे
लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी व नागवडे कारखान्याचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधताना 50- 55 वर्ष अहोरात्र कष्ट घेऊन सत्तेपेक्षा सेवेला अधिक प्राधान्य दिले असे गौरदगार युवा नेते दिग्विजय नागवडे यांनी जनसंवाद अभियान निमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काढले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सौ अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठान आयोजित श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ जनसंवाद अभियान निमित्त लिंपणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आपले विचार मांडताना युवा नेते दिग्विजय नागवडे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी समाजकारण करत असताना श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याचे विकास पर्व सुरू झाले. तालुक्यातील जनतेने अनुभवीले. प्रसंगी बापूंनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर इत्यादींच्या कष्टाला दाम मिळाले पाहिजे तो ताठ मानेने जीवन जगला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बापूंनी नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखानदारी उभी करून या सहकार चळवळीच्या माध्यमातून बापूंनी तालुक्यात घोड, कुकडीचे पाणी या दुष्काळी तालुक्याला मिळवून दिले. यासाठी विशाल कुकडी परिषदेचा लढा उभारला. त्यामुळे श्रीगोंदा तालुका आज जवळपास 70 -72 टक्के सिंचन क्षेत्राखाली आला. खेडोपाडी शिक्षणाची ज्ञानगंगा उभी करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुला मुलींना गावातच शिक्षणाची सोय केली. सतत विकासाचा ध्यास घेऊन बापूंनी सर्वसामान्यांचे जीवन प्रफुल्लित केल्याचे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, तोच वारसा आम्ही नागवडे कुटुंब सक्षमपणे चालवतो आहे. श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने बापूंच्या नंतरही दादा आईंना मौलिक साथ दिली. काँग्रेस पक्षाने देखील आमच्या नागवडे कुटुंबावर जिल्ह्याची जबाबदाऱ्या सोपवल्या. जिल्हा बँकेतही आम्हाला संधी मिळाली. सहकारी साखर कारखानदारी चालवण्यासाठी सभासदांनी देखील आमच्यावर मोाठा विश्वास टाकला. हा केवळ जनतेचा आशीर्वाद व बापूंनी दिलेले योगदान तोच वारसा आम्ही सक्षमपणे चालवत आहोत. यापुढेही आम्हाला जनतेने भक्कमपणे साथ द्यावी आम्ही निश्चितपणे तालुक्याचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही दिग्विजय नागवडे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा तालुक्यात डोंगराएवढे काम केले. पद असो वा नसो परंतु सर्वसामान्य माणूस व त्याचे जीवनमान सुधारले पाहिजे हा दृष्टिकोन बापूंनी समोर ठेवला आणि तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. तोच वारसा दादा आणि वहिनी यांनी बापूंचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत. बापूंचे श्रीगोंदा तालुक्यात लाभलेले योगदान त्यामुळे नागवडे कुटुंबातून देखील आमदार होण्याची पात्रता निश्चितपणे आहे. जनतेने देखील तालुक्याचा उर्वरित विकास साधण्यासाठी राजेंद्र दादा नागवडे व वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

... माजी संचालक प्रा सुनील माने यावेळी बोलताना म्हणाले की, नागवडे कुटुंब हे सर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष देणारे कुटुंब असून, सर्वसामान्य जनता आणि नागवडे कुटुंब हि नाळ सहकार महर्षी बापूंच्या माध्यमातून गेल्या 50 -60 वर्षापासून जोडले गेले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सहकार, शिक्षण व सिंचन क्षेत्रात सहकार महर्षी बापूंचे मोठे योगदान आहे. मागील इतिहास पाहता माजी आमदार राहुल जगताप, आमदार बबनराव पाचपुते यांना आमदार करण्यासाठी नागवडे कुटुंबांनी प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांनी देखील नागवडे कुटुंबातील जो व्यक्ती 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहतील त्यांना देखील साथ देण्याचे आवश्यकता आहे प्रसंगी तालुक्यातील जनतेने देखील आता नागवडे कुटुंबातीलच आमदार हवा अशी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत असे सांगितले.

यावेळी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब बरकडे, अॅड अशोक रोडे, सुनील जंगले, आदेशशेठ नागवडे, विठ्ठल जंगले, पै. सतीश भगत पद्माकर पवार आदींनी तालुक्याला नागवडे कुटुंबांनी दिलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी चंद्रकांत भोईटे, चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक विश्वनाथ गिरमकर, निळकंठ जंगले, रावसाहेब कुरुमकर, विश्वनाथ गिरमकर, उदयसिंह जंगले, चेअरमन रवींद्र खळतकर, मधुकर होले, संपत होले, मा चेअरमन लक्ष्मण भोईटे, दादा कुरुमकर, आदींसह ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य ,सेवा संस्थेचे आजी माजी सदस्य, नागवडे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दादा कुरुमकर यांनी केले. आभार संचालक विठ्ठल जंगले यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.