करमाळ्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाची स्थापन

By : Polticalface Team ,25-05-2023

करमाळ्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाची स्थापन करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्राम विकास विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नेरले येथील महेशराजे भोसले यांची निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक निनाद पटवर्धन यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र दिले. प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायत राज व ग्रामविकास या विभागाच्या करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व आढावा सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, करमाळा तालुका प्रभारी विक्रांत शिंदे, सोलापूर जिल्हा सहसंयोजक अमरजीत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करमाळा तालुका भाजपा च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, जितेंद्र शिंदे, जिल्हा सहसंयोजक व तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांनी कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यावेळी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख निनाद पटवर्धन यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जावे, कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, प्रत्येक कुटुंबामध्ये कोणी एक संबंधित कोणत्याही योजनेचा लाभार्थी मिळणारच आहे. ज्या लाभार्थ्यांना योजना लागू होते त्यांना ती योजना पंचायत राज च्या माध्यमातुन मिळवून द्यावी. पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्याच्या साधारणता 1200 च्या आसपास योजना आहेत, अनेक योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नाहीत, यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन योजनांची माहिती सांगायची आणि यामधून जे लाभार्थी मिळणार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने काम केले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक समाज बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पूर्ण होणार आहे. यावेळी तालुका सहसंयोजक पदी किरण वाळूंजकर, विशाल पाटील, शिवाजी जाधव, दत्तात्रय देशमुख, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, सोनाली क्षिरसागर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी करमाळा शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल, सरचिटणीस शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर, नितीन झिंजाडे आदी उपस्थीत होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी