नागवडे कारखान्याच्या कामगारांचे तांत्रिक अडचणीमुळे पगार थकले - आनंदराव वायकर

By : Polticalface Team ,26-05-2023

नागवडे कारखान्याच्या कामगारांचे तांत्रिक अडचणीमुळे पगार थकले - आनंदराव वायकर
श्रीगोंदा प्रतिनिधी :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे काही तांत्रिक अडचणीमुळे थोडे पगार थकित असल्यामुळे कृपया कोणी त्याचे राजकारण करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून संस्थेची बदनामी करू नये असे आवाहन कामगार युनियनचे सरचिटणीस काॅ. आनंदराव वायकर यांनी केले आहे.

कॉम्रेड वायकर म्हणाले की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखाना व्यवस्थापनाने कामगारांचे यापुर्वी कधीही पगार थकविलेले नाहीत. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी पन्नास वर्ष कामगारांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देऊन न्याय दिलेला आहे. तोच वारसा विद्यमान चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळाने चालविलेला असून नागवडे कारखान्यात कधीही कामगारांवर अन्याय केलेला नाही. शासनाने सन २०१४ मध्ये कामगार प्रश्नावर नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीत स्व. बापूंनी व सन २०२० मध्ये राजेंद्र दादा नागवडे यांनी कामगार प्रश्नावर अतिशय सकारात्मक भूमिका मांडून कामगारांना चांगल्या सवलती देण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. या दोन्ही कराराची अंमलबजावणी सर्वप्रथम नागवडे कारखान्याने केलेली असून त्यातील फरकाची रक्कमही देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे.

प्रतिवर्षी मे ते एप्रिल या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून कारखान्यामार्फत त्यांचा सन्मान करण्याची परंपरा स्व. बापूंनी ३५ वर्षांपूर्वी सुरू केलेली होती ती कारखाना व्यवस्थापनाने आजही चालू ठेवलेली आहे. मागील वर्षी कामगार युनियन आणि कारखाना व्यवस्थापन यांच्या समन्वयाने शंभर पेक्षा अधिक कामगारांना सेवेत कायम करण्यात येऊन त्यांना नियमानुसार पगार वाढीचा लाभ देण्यात आलेला आहे. फंडाचा भरणा सुद्धा दरमहा नियमितपणे कारखान्याने केलेला आहे. स्थानिक पातळीवर व्यवस्थापन व युनियन यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय असून दिनांक १७ रोजी झालेल्या समक्ष चर्चेमध्ये दोन-तीन दिवसात पगार करण्याचे आश्वासन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिलेले असून अल्पावधीत सर्व सुरळीत होईल याचा आम्हाला विश्वास आहे. सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची उपदानाची रक्कम कारखाना वेळोवेळी अदा करीत आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या कामगारांचे पगार थकीत आहेत. काही कारखान्यांचे आठ ते दहा महिन्यापर्यंतचे पगार थकित आहेत. असे असताना सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांचे पगार थकीत असल्याचे कोणी राजकारण करू नये व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून संस्थेची बदनामी करू नये असे आवाहन कॉम्रेड वायकर यांनी केले आहे. यावेळी कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष