सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधताना समतोल राखला -मेजर प्रकाश चव्हाण
By : Polticalface Team ,26-05-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी नंदकुमार कुरूमकर )- श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते शिक्षण व सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधताना समतोल राखला. त्यामुळे श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम झाल्याचे, गौरवद्गार माजी सैनिक प्रकाश चव्हाण यांनी आयोजित अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने जनसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा येथे अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठानचा जनसंवाद समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी सैनिक प्रकाश चव्हाण हे होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी सैनिक चव्हाण पुढे म्हणाले की, श्रीगोंदा या दुष्काळी तालुका उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रथम खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर साखर कारखानदारी उभारल्यानंतर शेतीला पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी घोड -कुकडीच्या सिंचन व्यवस्थेची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. आणि तेथून पुढेच खऱ्या अर्थाने तालुक्याचे अर्थकारण वेगाने फिरले. एवढ्यावरच बापू थांबले नाहीत तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पदवीपर्यंत शिक्षण मिळण्यासाठी खेडोपाडी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालय ज्ञानगंगा सुरू केल्या. संपूर्ण आयुष्यामध्ये सहकार महर्षी बापूंनी शेतकरी माझा आणि मी शेतकऱ्याचा हे नाते संपूर्ण तालुक्यात जोडले गेले. अशा या थोर सहकार व शिक्षण महर्षींनी संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात अहोरात्र कष्ट घेतले. त्यामुळे सहकार महर्षी बापूंनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना समतोल राखला आहे. तोच वारसा आणि वसा राजेंद्र दादा नागवडे व सौ. अनुराधाताई नागवडे हे नेटाने पुढे चालवत आहेत. निश्चितच 2024 ला नागवडे कुटुंबातील व्यक्तीच आमदार होणार आहे. तशा प्रकारच्या भावना सर्वसामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांनी निश्चय केल्याचे श्री चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रास्ताविकात प्रा रघुराज कुरुमकर यावेळी बोलताना म्हणाले की, नागवडे कुटुंबामुळेच श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला वैभव मिळाले. त्यामुळेच श्रीगोंदा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला त्यातून सभासद कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले त्यासाठी बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असल्याचे सांगितले.
यावेळी युवा नेते दिग्विजय नागवडे, वांगदरीचे सरपंच आदेश शेठ नागवडे, प्रा सुनील माने, कुमारी श्रुती चौधरी, पै. सतीश भगत, मा चेअरमन रवींद्र माने, संचालक विठ्ठल जंगले, प्रा रघुराज कुरुमकर आदींनी नागवडे कुटुंबांचे 50- 60 वर्षात लाभलेले तालुक्याला योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर, योगेश भोईटे, मारुती पाचपुते, मुंढेकरवाडी सेवा संस्थेचे संचालक आप्पासाहेब कुरुमकर, माजी उपसरपंच बापूराव कुरुमकर, राजेंद्र कुरुमकर, चंद्रकांत कुरुमकर, विजय कुरुमकर, भाऊसाहेब चव्हाण, श्री ठोमस्कर यांच्यासह ग्रामपंचायत व सेवा संस्थांचे आजी -माजी पदाधिकारी तसेच नागवडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रघुराज कुुरुमकर यांनी केले. आभार रवींद्र भोंडवे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.