By : Polticalface Team ,31-05-2023
बिजनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन सांगली या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी स्वीकारून उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना स्त्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. श्री पुरस्कार हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असून यंदा संस्थेचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे. राज्यातील विविध भागातील व विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून त्यांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येत असते. त्याप्रमाणे चालू वर्षे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. अनुराधा नागवडे यांची रौप्य महोत्सवी श्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून सन्मानपूर्वक सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री. मुजावर यांनी कळविले आहे.
या पुरस्काराबद्दल सौ. नागवडे यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. धर्मानाथ काकडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. वाचक क्रमांक :