गो तस्करांना १,८०,०००/- रुपये दंड भरण्याचा न्यायालयाचा आदेश.
By : Polticalface Team ,01-06-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :-
दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी मानद पशुकल्याण अधिकारी डॉ. आबा नायकवडी यांनी श्रीगोंदा येथे १६ देशी बैल घेऊन जाणारा टेम्पो क्र. MH 08 H 1947 श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यासाठी कष्टपूर्वक प्रयत्न केले होते. यासाठी स्थानिक पोलिस अधिकारी श्री. ज्ञानेश्वर भोसले यांनी कायदेशिर सहकार्य केलते.
जनावरांचा ताबा कोणाकडे ठेवायचा. याविषयीचा खटला साधारण २ महिने श्रीगोंदा न्यायालयात चालू होता.
डॉ. नायकवडी यांच्या वतीने अँड. महेश वनराज क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले. प्रतीवादिंचे वकील अँड. गायकवाड यांची बाजू खोडून काढताना अँड. क्षीरसागर यांनी आपले कौशल्य पणाला लावले. त्यांनी सदर जनावरांच्या मालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. तसेच, सदर जनावरे शेतीसाठी वापरली जाणार नसल्याने त्यांची कत्तल होईल. असे न्यायालयात सांगितले.
न्यायमूर्ती एच जे पठाण यांनी सदर गोवंश रुक्मिणीमाता गोशाळेत ठेवण्याचा निकाल देऊन.. संबंधित आरोपींना त्या गोवंशाच्या चारापाण्यासाठी गोशाळेला १,८०,०००/- रुपये देण्याचा निर्णय दिला आणि सदर रक्कम न दिल्यास आयशर टेम्पो जप्त करण्याचे आदेश नमूद आहे.
वाचक क्रमांक :