अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा जीवनात प्रेरणा व नवचैतन्य देणारा -श्रीमती नयनतारा शिंदे

By : Polticalface Team ,01-06-2023

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा जीवनात प्रेरणा व नवचैतन्य देणारा -श्रीमती नयनतारा शिंदे
लिंपणगाव( प्रतिनिधी )--अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा जीवनात प्रेरणा व नवचैतन्य देणारा असल्याचे मत मढेवडगांव येथील प्रतिक फ्युएलिंग सेंटरच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्विकारताना व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने यावर्षी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक गावातील कर्तबगार दोन महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून सन्मानीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मढेवडगांव ग्रामपंचायतीचे वतीने दि. ३१ रोजी श्रीमती नयनतारा शिंदे व श्रीमती प्रतिभा उंडे यांना प्रशासक सारिका हराळ व ग्रामसेविका स्वाती लांबकाने यांचे शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून सन्मानीत करणेत आले. सदर प्रसंगी त्या बोलत होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन अतिशय प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करुन त्या म्हणाल्या की, त्यांच्या जीवनात अकाली वैधव्य आलं, दोन लहान मुल, वैयक्तीक संसार प्रपंच व राज्यकारभाराची फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येवून पडली. परंतु मोठ्या हिंमतीने न डगमगता त्या उभ्या राहिल्या स्वकियांबरोबरच परकिंयाबरोबर लढाई करुन चंद्र सुर्य असेपर्यंत नाव राहिल असे काम त्यांनी केले. माझ्याही जीवनात काहीशी अशीच परिस्थिती मला अनुभवावी लागली. परंतु अहिल्यादेवींचा आदर्श व प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून हिंमतीने उभे राहिले. आमचा परिवार व मढेवडगांव ग्रामस्थ सदैव आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणुन इथपर्यंतची वाटचाल यशस्वी झाली. आज अहिल्यादेवीच्या नावाचा पुरस्कार स्विकारताना अतिशय आनंद व समाधान होत असुन भावी वाटचालीसाठी ही फार मोठी शिदोरी ठरणार आहे. शासनाचा हा उपक्रम महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे व प्रेरणा देणारा असल्याचे सांगुन श्रीमती शिंदे यांनी या पुरस्काराबद्दल शासन, प्रशासन व ग्रामस्थ यांचे मनापासुन आभार व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे, युवक नेते संग्राम शिंदे, भाऊसाहेब मांडे, अनिकेत मांडे, दरेकर सर, अमोल गाढवे, दिपक गाडे, केतन साळवे, शुभम वाबळे, राणीताई शिंदे, प्रांजली शिंदे, स्मिता कुलकर्णी, अरुणा साळवे, सुमय्या हवलदार, वंदना मांडे, जयश्री कांबळे, सुनिता कोळपे, सुरेखा भोसले, विजया उंडे, निर्मला साळवे, स्वाती साळवे यांच्यासह ग्रामस्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.