पेडगावच्या 91 वर्षीय आजीबाईंचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जाहीर सत्कार...!
By : Polticalface Team ,02-06-2023
श्रीगोंदे: दि. 31/मे/2023 रोजी पेडगाव ग्रामपंचायतीमध्ये "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. गावात आदल्या दिवशी दोन दु:खद घटना घडल्याने हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने घेण्यात आला.
या वेळी गावातील " 91 वर्षीय आजीबाई श्रीमती हिराबाई बबन घोलप " यांचा पुरस्काराचे सन्मानपत्र, चोळी-पातळ, श्रीफळ देऊन विषेश सत्कार करण्यात आला. आजींने त्यांच्या एन उमेदीच्या काळात सलग 30 वर्ष पेडगाव आरोग्य उपकेंद्रात मदतनीस म्हणून कार्य केले होते. ज्या काळात महिलांचा सामाजिक क्षेत्रात जास्त सहभाग नव्हता त्या काळात या आजीने निर्भयता दाखविली. आजीचा जन्म 1932 साल चा. तत्कालीन काळच्या सामाजिक व्यवस्थेमुळे आजीला शिक्षण घेता आले नाही. परंतू अध्यात्मिक स्वभाव आणि वाचनाची तीव्र इच्छा यामुळे प्रयत्न व सरावाने आजीने अक्षर ओळख करून घेतली. नंतर वाचता येत असल्यानेच आजींना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. आत्ताच्या तुलनेने अतिशय प्रतिकूल काळात त्यांनी काम केले. तद्नंतर आजींच्या सूनबाई " सौ रूख्मिनी घोलप" यांनीही सलग आठ वर्षे याच क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे योगदान दिले.
पुरस्कार मिळाल्याने व्यक्तीला आणखी उत्तम काम करण्यास प्रेरणा मिळते. कामास हुरूप येते. आजींचे कार्य तर मोठे आहेच. सध्या त्या सेवानावृत्त आहेत. तेव्हा कमिटीने असा निर्णय घेतला की, आपन आजींचा पुरस्काराचे सन्मानपत्र, साडी-चोळी, श्रीफळ देऊन विषेश सत्कार करु व पुरस्कार; सध्या कार्यरत असणाऱ्या दोन महिलांना देवू. असा विवेकी निर्णय घेतण्यात आला.
या आजींने ब्रिटिशांची जुलमी राजवटही अनुभवलेली आहे. लोकशाही शब्दाचा अर्थ भलेही आजींना माहिती नाही; परंतु तत्कालीन महाराष्ट्रातील सामाजिक विषमता आणि आजची लोकशाहीमुळे आलेली समानता हा चांगला बदल आजी अनुभवत आहेत. आजींना शिक्षणाचे महत्त्व फार आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक पुस्तके, ग्रंथ वाचलेले आहेत.
अजींचा हा सत्कार अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल. चांगले काम करत राहिले तर म्हातारपणापर्यंत सुद्धा कौतुकास पात्र होता येते याचेच हे एक उदाहरण आहे.
या वेळी माजी सरपंच सौ. सुलोचनाताई कणसे, सहायक गटविकास अधिकारी मनोज बनकर साहेब, आरोग्य विभागाच्या सोनटक्के मॅडम, आशा सेविका वर्षा गावडे, कुंदा क्षीरसागर, अंगणवाडी सेविका फरजाना शेख आणि सुरेखा खेडकर, ललिता राईंज मॅडम, हेमांगीताई ओगले, ग्रामविकास अधिकारी महांडूळे साहेब, लिपिक मल्हारी झिटे, पत्रकार शफिक हवालदार, कृष्णा घोलप, शहाजीखेडकर, भगवान नवले, भगवान घोलप, मधुकर गोसावी, नारायण घोलप, विजय काराळे, अरूण घोलप, विठ्ठल बोबडे गावातील तरून वर्ग ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.