किल्ले राजगडावर वंशज घराण्याच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,03-06-2023

किल्ले राजगडावर वंशज घराण्याच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा किल्ले राजगड: दिनांक ०२ जून रोजी शक्तिपीठ दुर्गराज, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, आर्थात गडांचा राजा "किल्ले राजगड" वर समस्त शिव-शंभुभक्त व हिंदू बांधवांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. या दिव्य सोहळ्यासाठी हजारो शिव शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी शुर सेनापती रणधुरंदर संताजी घोरपडे यांच्या इतीहासावरील चित्रपटाचा बॅनर सर्व सरदार घराण्यातील वांशजांच्या हस्ते प्रकाशित / रिलीज करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांचे राष्ट्रीय लीडर, राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच शंभुपत्नी महाराणी येसूबाई साहेब यांचे वडील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज, शभुसेना प्रमुख मा. दिपकजी राजे शिर्के, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सरसेनापती रवींद्रजी कंक, नरविर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालजी मालुसरे, सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज सरदार मंगेशराव शिळीमकर, वीर धाराऊ माता गाडे पाटील यांचे पुत्र सरनौबत अंतोजी गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमीत दादा गाडे पाटील, सरदार गोदाजीराजे जगताप यांचे वंशज सरदार मंथनराव जगताप, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार समीर राव इंदलकर आदी थोर राजघराणे व शूरवीर सरदार,मावळ्यांच्या घराण्यातील वंशज मंडळी तसेच राष्ट्रवादी सैनिक सेलचे संदीप देसाई आदी. मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले राजगडावर दुग्धअभिषेक करून महाआरती करण्यात आली.गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी