श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील एकूण 14 अवैध उमेदवाराची मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल- प्राध्यापक रामदास झोळ यांची माहिती
By : Polticalface Team ,06-06-2023
जेऊर प्रतिनिधी तालुक्यातील श्री मकाई स.सा. कारखान्याच्या निवडणुकीत छाननीत अवैध ठरलेल्या उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी होऊन शनिवारी हे सर्व अपील फेटाळण्यात आल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी दिला. यानंतर प्रा. रामदास झोळ यांनी आज सोमवार दि. ५ रोजी मुंबई येथे हायकोर्टात याबाबत रिट याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे.
प्रा.झोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 14 उमेदवारांनी मुंबई येथे रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये खालील उमेदवाराचा समावेश आहे
पारेवाडी ऊस उत्पादक गटातून
१) रामदास मधुकर झोळ, २) माया रामदास झोळ, ३) बाबर प्रवीण तानाजी
चिकलठाण गटातून
१) पाटील नंदकुमार, २) देवकर अण्णासाहेब भागवत
मांगी गटातून
१) वाळुंजकर संतोष नारायण,
भिलारवाडी गटातून
१) बाबर प्रवीण तानाजी,
इतर मागासवर्गीय गटातून
१) बोबडे मारुती रंगनाथ,२) भानवसे अंकुश रामचंद्र,
एस.सी. गटातून
१) जाधव अशोक उत्तम,
एनटी गटातून
१) डोंबाळे भगवान गणपत
तर
महिला राखीव गटातून
१) माया रामदास झोळ, २) फलके अश्विनी सुनील
या उमेदवारांचा समावेश आहे. या याचिकेवर आठ दिवसांत निकाल येण्याची प्रा. झोळ यांना अपेक्षा आहे.
तसेच मकाईच्या मागील संचालक मंडळातील उमेदवारांच्या मंजूर अर्जांवर प्रा. झोळ यांनी हरकती घेत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि या सर्व हरकती उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यातच वांगी गटातून बागल विरोधी उमेदवार अमित केकान यांनी माघार घेतल्यामुळे बागल गटाचे पारडे वरचेवर जड होत आहे. शिवाय विरोधी गटाने दावा केलेले उमेदवार आपल्या बाजूने घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न बागल गटाकडून चालू असल्याचे दिसते आहे.
परंतु प्रा. झोळ मात्र बागल विरोधातील आपला लढा निकराने लढवत आहेत. या रिट याचिके सोबतच बागल गटाच्या वैध अर्जांवरील त्रुटीं विरोधात ‘इलेक्शन पिटीशन’ दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे प्रा. झोळ यांनी यावेळी सांगितले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी