शेतकरी बांधवांनो पेरणीची घाई करू नका पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच व जमिनीत ओलावा निर्माण झाल्या नंतर पेरणी करावी कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले शेतकरी बांधवांना आवाहन
By : Polticalface Team ,06-06-2023
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी बांधवांना आवाहन केले की येते की शेतकरी बांधवांनी खरीप पिकाच्या पेरणीसाठी घाई करू नये. पेरणी योग्य पाऊस (७५ ते ८० मि.मी.) झाल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालेनंतरच पेरणी करावी. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५२१.७४ मि.मी. आहे. खरीपामध्ये एकूण २७८६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठीचे पुरेसे बियाणे व खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत निविष्ठा विक्रेते यांचेकडूनच बियाणे, खते व औषधे खरेदी करावेत. खरेदी केलेल्या निविष्ठांचे पक्के बील घ्यावे. बॅगवरील किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाण्याची पिशवी, लेबल व बील जपून ठेवावे. बियाणे, खते व औषधे बाबत काही तक्रार असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा. पेरणी करताना बियाण्यास रासायनिक तसेच जैविक बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खताचा जमीन आरोग्य पत्रिका, जमीन सुपिकता निर्देशांकानुसार संतुलित वापर करावा असे आवाहन शेवटी कृषी अधिकारी वाकडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :