शिक्षकच समाजपरिवर्तन करू शकतात - नागवडे
By : Polticalface Team ,06-06-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. आज फक्त मुलांना शिकवणे एवढीच जबाबदारी शिक्षकाची नसून विद्यार्थी, शाळा व समाजविकासात शिक्षकाचे योगदान आवश्यक आहे. सेवानिवृत्त शिक्षकांनी हे कार्य केले ,आता नवीन शिक्षकांनी हे कार्य पुढे न्यावे कारण शिक्षकच समाजपरिवर्तन करू शकतात असे प्रतिपादन नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवानराव गायकवाड यांच्या पंच्याहत्तराव्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मा .कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले होते. निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांसह उपस्थितांचे केशर आंब्याचे कलमी रोपे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मार्केट कमिटीचे संचालक दिपक पाटील भोसले म्हणाले की आम्हाला जुन्या शिक्षकांनी तळमळीने शिकवले म्हणूनच आम्ही घडलो. गायकवाड गुरुजींनी त्या काळी कष्टातून शिक्षण घेतले, त्याची जाणीव ठेवून अनेक विद्यार्थी घडवले त्या आशिर्वादानेच त्यांचा आज अमृत महोत्सव साजरा होत आहे. यावेळी कु. तनिष्का पाचपुते,अश्विनी गायकवाड फाळके, वैशाली पाचपुते यांनी तसेच कवयित्री माधूरी काकडे यांनी कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मढेवडगाव ग्रा पं सदस्या देवयानी शिंदे ,मार्केट कमिटीचे संचालक रामदास झेंडे,शिक्षक बँकेचे मा.चेअरमन बन्सी उबाळे, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ प्रतिभाताई पाचपुते,भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई पाचपुते,मा. पं स सदस्य काकासाहेब रोडे, संतोष रोडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ प्रतिभाताई पाचपुते, पुण्याचे सहायक उपनिबंधक महेंद मगर, नागवडे कारखान्याचे संचालक विठठल बापू जंगले, राकेश पाचपुते, प्रा .कैलास माने, अनिलमामा पाचपुते, डॉ पवार , डॉ धनंजय पाचपुते,मार्केट कमिटीचे संचालक दिपक पाटील भोसले,दत्तात्रय गावडे, विठठल नाना काकडे, जालिंदर पाचपुते, वैभव पाचपुते,साहेबराव उंडे, कडेठाण सेवा सोसा. संचालक चंद्रकांत दिवेकर, मा प्राचार्य बबनराव दिवेकर,पं स सदस्य जिजाबापू शिंदे, मा सदस्य सुनील सूर्यवंशी, नानासाहेब ससाणे, सुभाष रोडे, विठाई पतसंस्थेचे चेअरमन मिठूशेठ शिंदे, सचीव आबासाहेब रोकडे, रत्नमालाताई पाचपुते, सुनंदाताई पाचपुते, सुभाषदादा पाचपुते, तात्यासाहेब रोडे, झुंबरराव रोडे, संदीप रोडे, मढेवडगावचे मा सरपंच प्रकाश उंडे, नारायण दिवेकर, संभानाना पाचपुते, जयसिंग कुरुमकर, मुकिंदा आठवे ,शिवाजी पवार, श्रीराम वाबळे,, दादासाहेब घोंडगे, बाळकृष्ण गायकवाड, वसंतराव धामणे, बिभीषण हराळ, मोहन पवार, श्रीकृष्ण कुलकर्णी, राजदत्त ओहोळ, केंद्रप्रमुख शांताराम उबाळे, सुरेश पवार, गोवर्धन मगर, पोपटराव नागवडे, बापूराव क्षिरसागर, चिंतामण गुंड, थोरात सर, धोत्रे सर, राहिंज सर, जठार सर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुभाष दादा पाचपुते,संतोष पाचपुते, विठ्ठल आप्पा पाचपुते, अभय भापकर, राजेश फाळके, फक्कडराव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकर यांनी केले. सेवानिवृत्त प्राचार्य फक्कडराव गायकवाड यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी