भावडीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,06-06-2023

भावडीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. श्रीगोंदा प्रतिनीधी:- श्रीगोंदा तालुक्यातील भावडीच्या सरपंच धनश्री अर्जुन करनोर आणि ग्रामसेवक आतीष दादासाहेब आखाडे यांच्या विरोधात सुमारे २१ लाख २३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांच्या आदेशावरून विस्तार अधिका-यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भावडी येथे नव्यानेच अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांनी सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सदर तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीसाठी मार्च महिन्यात उपस्थित राहण्याचे कळविण्यात येऊनही चौकशीकामी सहकार्य केले नाही. त्यामुळे पुन्हा एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली. परंतु, त्यानंतरही ग्रामपंचायतीचे नमुना १ ते ३३ तसेच विहीत विकास कामांच्या निविदा नस्ती, मूल्यांकन, काम पूर्णत्वाचे दाखले इत्यादी दप्तर उपलब्ध करुन दिले नाही. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचा अवमान करुन प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केला. एप्रिल महिन्यात पुन्हा नोटीस बजावण्यात आल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी खुलासा केला. परंतु, कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यानंतर चौकशी समितीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय बँक खात्याची माहीती बँक ऑफ महाराष्ट्र श्रीगोंदा शाखेकडून घेतली. त्यावरून ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, १४ वा आणि १५ वा वित्त आयोग निधीतून वेळोवेळी २१ लाख तेवीस हजार तीनशे बावन्न रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. सदर रक्कम खर्च केल्याबाबतची आवश्यक कागदपत्र सादर न केल्याचे चौकशी समितीने सदर अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना सादर केला. त्या अहवालावरून सरपंच धनश्री अर्जुन करनोर आणि ग्रामसेवक आतीष दादासाहेब आखाडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरीष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विस्तार अधिकारी पोपट शहाजी यादव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी