माजी नगराध्यक्ष यांनी कागदपत्रांचा गैरवापर करून लाखो रुपयाला एकाला फसविल्याप्रकरणी नगराध्यक्ष यांच्यासह ७ जनावर गुन्हा दाखल
                      
                
            
               By : Polticalface Team ,07-06-2023
       
               
                           
              श्रीगोंदा प्रतिनिधी :-
     श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा व त्याचे पती यांनी एका व्यक्तीची कागदपत्रे घेऊन पतसंस्थेची नमुना पडताळणी घेऊन कर्ज प्रकरणास जमीनदार होण्यास पात्र नाही असे सांगून त्या व्यक्तीची फसवणूक करत लाखो रुपयाचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने माजी नगराध्यक्षा यांच्यासह त्यांचे पती यासह ५ जनावर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत 
                                                                                                 ऑगस्ट 2011 ते माहे ऑगस्ट2022 चे दरम्यान माजी नगराध्यक्षा सुनिता मछिंद्रा शिंदे व त्याचे पती  मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे रा.श्रीगोंदा   यांनी संगणमताने फिर्यादी सागर साहेबराव लोखंडे वय-32 धंदा-शेती रा. श्रीगोंदा यांचा विश्वास सपांदन करुन फिर्यादीचे नावाचे मतदान ओळखपत्र ,रेशनकार्ड,फोटो व खाजगी पतंसंस्थेचे सही नमुना पडताळणी फॉर्म घेवुन सदरची कागदपत्र जामीनदार राहण्यासाठी  पात्र नसल्याचे सांगुन सदर कागदपत्राचा गैरवापर करुन सन 2011 मध्ये श्रीराम इक्विपमेंट फायनान्स कंपनी लि.अहमदनगर चे तत्कालीन कर्मचारी यातील अभिषेक मच्छिद्रनाथ पालवे  रा.अहमदनगर व तत्कालीन शाखाधिकारी नाव पत्ता माहित नाही व श्रीराम इक्विपमेंट फायनान्स कंपनी लि.अहमदनगर  यांचेशी संगणमताने कट करुन श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुनिता मछिंद्रा शिंदे व त्याचे पती  मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे रा.श्रीगोंदा   यांनी सागर साहेबराव लोखंडे वय-32 धंदा-शेती यांचे नावे श्रीराम इक्विपमेंट फायनान्स कंपनी लि.अहमदनगर यांचेकडुन कर्ज प्रकरण करार नंबर 1- AHNGRO108220001 व करार नंबर -2-AHNGRO108260001  यामध्ये  कर्ज घेवुन सदर कर्जप्रकरणावर फिर्यादीच्या खोटया सहया करुन फिर्यादीला बनावट जामीनदार म्हणुन दाखविले आहे तसेच पुन्हा सन 2013 साली  फिर्यादीच्या नावाचा गैरवापर करुन बनावट  कागदपत्र तयार करुन फिर्यादीचे नावकर्जदार म्हणुन  श्रीराम इक्विपमेंट फायनान्स कंपनी मध्ये लोन करार क्र. SEF001309210003  अन्वये 29,35000/- रुपये व लोन  करार क्र. SEF001309210004  अन्वये रक्कम 8,50000/-रुपये कर्ज घेवुन संगणमताने कट करुन स्वत:चे आर्थीक लाभाकरीता फिर्यादीची वेळोवेळी फसवणुक करुन व फिर्यादीच्या कुटुंबाला मानसिक  तसेच शारीरीक त्रास देवुन श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीने फिर्यादीचे सिबील खराब करुन फिर्यादीचे  आर्थीक नुकसान केले आहे  व श्रीराम ट्रान्सपोर्ट कपंनीचे सध्याचे  श्रीगोंदा येथील शाखाधिकारी  सचिन  दत्तात्रय पवार,कायदेशीर सल्लागार ,दिनेश विजय बिहाणी,लवाद अधिकारी ,मुरलीधर दत्तात्रय पवार रा.अहमदनगर  यांनी फिर्यादीचे नावावर बनावट कर्ज प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता फिर्यादीला वेळोवेळी कर्ज भरण्यास सांगुन फिर्यादिची मालमत्ता जप्त करणेकामी कोट्यावधी रुपयाचा अवॉर्ड  क्र.147/2022 अन्वये कारवाई केली आहे. हि माहिती   सागर साहेबराव लोखंडे वय-32 धंदा-शेती रा. श्रीगोंदा याना समजताच त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्षा सुनिता मच्छिद्रं शिदे रा.श्रीगोंदा त्याचे पती  मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे रा.श्रीगोंदा तसेच  अभिषेक मच्छिद्रनाथ पालवे  रा.अहमदनगर ,तत्कालीन शाखाधिकारी नाव पत्ता माहित नाही व श्रीराम इक्विपमेंट फायनान्स कंपनी लि.अहमदनगर  तसेच  श्रीगोंदा येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनन्स चे शाखाधिकारी व सचिन  दत्तात्रय पवार,कायदेशीर सल्लागार , दिनेश विजय बिहाणी,लवाद अधिकारी व मुरलीधर दत्तात्रय पवार रा.अहमदनगर यांचेवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 420,465,467,468,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वाचा पोलीस कसून शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत कण्हरे हे करत आहेत
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष