प्रतिनिधी /श्रीगोंदे. :- . पोलीस महानिरिक्षक परिक्षेत्र नाशिक बी.जी. शेखर पाटील यांचे संकल्पनेतील एक कॅमेरा पोलीसासाठी नाविण्यपुर्ण योजनेचा भाग म्हणून . पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला यांच्या मार्गदर्शना खाली व जिल्हा अधिकारी यांचेकडील आदेश अन्वये पोलीस निरिक्षक संजय आर ठेगे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील सर्व मेडीकल आस्थापना यांची दि.०७/०६/२०२३ रोजी सकाळी ११/०० ते १२/३० वा. दरम्याने पोलीस स्टेशन स्तरावर बैठक आयोजित केली होती , शास्त्रोक्त पुराव्याचा तपासात उपयोग व्हावा, अचुक व वस्तूनिष्ठ चित्र समोर यावे या करिता चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध होईल या दृष्टीने तसेच पोलीस दलामधील एक घटक व प्रतिनिधी म्हणून सीसीटीव्हीचा उपयोग होईल. या करिता मेडीकल आस्थापने मध्ये व बाहेरील बाजूस मुख्य रस्ता वर्दळीचा भाग या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे बाबत सुचना दिल्या व त्यांनी कॅमे-या बसविणे बाबत सकारत्मक प्रतिसाद दिला. तसेच मिटिग आयोजित करणेची पुर्वी येळपणे गावातील श्री. खंडेश्वर मेडीकल स्टोअर्स व माऊली मेडीकल स्टोअर्स यांनी आपले दुकानात व रोडच्या बाजूला सी.सी.टी.व्ही कॅमेरा बसविल्याने आस्थापना मालक अनिल रामदास खामकर व महेश अकुंश पवार यांचा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच या उपक्रमात पोलीस स्टेशन हददीतील सर्व पोलीस पाटील यांनी मोलाची भुमिका बजविली. सर्व मेडीकल आस्थापना मालक व पोलीस पाटील सदर बैठकीस उपस्थित राहिल्याने पोहेकॉ हसन शेख यांनी त्यांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :