जेजुरी येथील खंडोबा देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी पोपटराव खोमणे तर विश्वस्त पदी मंगेश घोणे व अभिजीत देवकाते यांची निवड
By : Polticalface Team ,09-06-2023
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
जेजुरी येथील खंडोबा देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी पोपटराव खोमणे तर विश्वस्त पदी मंगेश घोणे व अभिजीत देवकाते यांची निवड झाल्याबद्दल उमाजी नाईक यांचे सातवे वंशज चंद्रकांत खोमणे व वडगाव निंबाळकर येथील उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील खोमणे यांनी पुणे येथे जाऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या नेत्या अलका शिंदे,रवी खोमणे, माऊली खोमणे,अशोक खोमणे उपस्थित होते.
पोपटराव खोमणे यांचे जेजुरी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल रामोशी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र यावेळेस पाहण्यास मिळालेले आहे.
वाचक क्रमांक :