जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
By : Polticalface Team ,10-06-2023
अमोल गायकवाड वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील लाटे (खलाटे येथील) येथील जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल लाटे माळवाडी या प्रचालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. त्याबद्दल लाटे व परिसरातील पालक वर्गामध्ये आनंदच वातावरण असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. या प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक काळभोर नेहा सुभाष 93.80 द्वितीय क्रमांक शिंदे प्रीती रमेश 86.40 तृतीय क्रमांक जाधव शुभम अनिल 85.20 मिळवून ग्रामीण भागात एक आदर्श निर्माण केलेला आहे.
तसेच NMMS परीक्षेमध्ये नऊ विद्यार्थी पात्र झालेले आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रशालीचे आदरणीय मुख्याध्यापक श्री गीरमे के.डी. यांचे अत्यंत उत्तम प्रकारचे नियोजन आणि पालकाचा असणारा संपर्क यामुळे शाळेचा उत्तम प्रकारचा निकाल लागलेला आहे. तसेच या ठिकाणी कार्यरत असणारे जनता शिक्षण संस्थेचे संचालक श्री. एजगर सर , सर्व शिक्षक शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी. यांचेही योगदान आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे, प्रशालेच्या वतीने,ग्रामस्थ सर्व माझी आजी पदाधिकारी, सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वां च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
वाचक क्रमांक :