रुग्णांनी मानले वैद्यकीय मदत पक्षाचे आभार
कर्करोगासाठी उपचारासाठी मुख्यमंत्र्यांकडून मिळाली 50 हजाराची मदत
By : Polticalface Team ,11-06-2023
करमाळा प्रतिनिधी
सोगाव तालुका करमाळा येथील जया कांतीलाल निकत 42 या महिलेला कर्करोगाचा त्रास होत होता यावर उपचारासाठी मदत मिळावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाकडे अर्ज केला होता त्यांना आज उपचार घेत असलेल्या संजीवनी हॉस्पिटल बार्शी या हॉस्पिटलच्या खात्यावर उपचारासाठी मदत म्हणून पन्नास हजाराची रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने जमा करण्यात आली आहे
जमा झाल्यानंतर जया निकत यांचे चिरंजीव अजित निकत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभार पत्र मानून त्यांना धन्यवाद दिले आहेत
मंत्र्याचे आभार मानणारे हे पत्र निकत यांनी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे व समन्वयक शिवकुमार चिवटे हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर यांच्याकडे दिली आहे
मदत मिळाल्यानंतर अजित निकत म्हणाले की खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांची अडचण समजून घेणारी नेते असून ही मिळालेली मदत आम्हाला लाख मोलाची असून आमच्यासारखे हजारो रुग्णांना अशी मदत मिळत आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाखो लोकांचा दुवा त्यांच्या पाठीशी आहे आम्ही सुद्धा कायमस्वरूपी त्यांच्या ऋणात राहवा अशी भावना व्यक्त केली
वाचक क्रमांक :