नांदेड येथील तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीगोंदात आरपीआयचे निवेदन.
By : Polticalface Team ,13-06-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी:-
नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली या गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या तरुणाचा गावातील गावगुंडांनी खुन केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे वतीने श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शहराध्यक्ष युवराजभाऊ घोडके यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार दिनांक १ जून २०२३ रोजी नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव या तरुणाने गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा मनात राग धरुन गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली. तसेच सदर घटनेची सी.बी.आय., सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्यात यावी, सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविणेत यावा आणि दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सदरील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक मदतीची गरज असल्याने पिडीत कुटुंबाला राज्य सरकारने ५० लाखाची मदत करावी व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी श्रीगोंदा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शहराध्यक्ष युवराज घोडके, राजू काळेवाघ, आनंद शिंदे, जॉन घोडके, चेतन ससाने, संदीप ससाने, अक्षय जाधव इत्यादी रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच गोरख घोडके, संदीप उमाप, अमर घोडके, मीराताई शिंदे, शिवा घोडके, संजय सावंत, नाना शिंदे, अजीम जकाते, समीर शिंदे, बापू माने, अक्षय आठवले, मौलाना आलिमसाब इत्यादी विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी ही उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी