श्रीगोंदा प्रतिनिधी दि१२/६/२०२३
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बैल बाजारा मध्ये शिवाजी गोविंद लिपणे रा. रांजणी,ता. नगर जि अहमदनगर यांची ५० हजारांची पिशवी चोरून नेली. शिवाजी गोविंद लिपणे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये संजय घेना बिटके रा. बिटकेवाडी ता. कर्जत यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे काष्टी येथील बैल बाजारात बैल खरेदीसाठी आले असताना त्यांच्या सोबत संजय गेणा बिटके रा. बिटकेवाडी ता. कर्जत हे होते. बैलाचा सौदा झाल्यानंतर शिवाजी गोविंद लिपणे यांनी बैलाच्या मालकाला देण्यासाठी आणलेल्या ५० हजार रुपये रकमेची पिशवी शनिवार दि.१० रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्यासोबत असणारे संजय गेणा बिटके यांनी बळजबरीने ती ५० हजार रुपयांची पिशवी हिसकावून घेतली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले तसेच मुकेश कुमार बडे हे करत आहेत.- आप्पा चव्हाण
वाचक क्रमांक :