व्यंकनाथ विद्यालयात नवागतांचे मोफत शालेय पाठ्यपुस्तक जोरदार स्वागत

By : Polticalface Team ,15-06-2023

व्यंकनाथ विद्यालयात नवागतांचे मोफत शालेय पाठ्यपुस्तक जोरदार स्वागत लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे 15 जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागवडे कारखान्याचे माजी संचालक विलासराव काकडे, पालक पुरुषोत्तम लगड, किरण काकडे, पांडुरंग करे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून पुढील शैक्षणिक वर्ष नवागातांना बुद्धी कौशल्याचे, यशदायी, फलदायी जावो अशा शुभेच्छा देऊन नवागतांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मार्च 2023 एसएससी व एच एस सी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या पाल्य व पालकांचा तसेच राज्य गणित प्रज्ञा परीक्षेत तेजस्विनी इथापे या विद्यार्थिनीने उत्तुंग यश मिळवल्याबद्दल यावेळी विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते नवग्रतांचे स्वागत करताना म्हणाले की, श्री व्यंकनाथ विद्यालयाचे विद्यार्थी बुद्धिवंत, गुणवंत व शिस्तप्रिय आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्यात भर पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक वर्ग नेहमीच ज्यादा तासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे मार्च -2023 चा एसएससी व एच एससी चा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. आता नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. मागील वर्षातील नववीचे विद्यार्थी आता दहावी मध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात भरपूर अभ्यास करून विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवावी. अभ्यासात काही त्रुटी आढळल्यास प्राचार्य अथवा आपल्या वर्ग शिक्षकांशी तात्काळ संपर्क साधावा. नवीन शैक्षणिक वर्ष सर्वच विद्यार्थ्यांना कीर्तीवंत, आनंददायी, यशदायी व उज्वल जावो अशा शुभेच्छा नवगतांना दिल्या. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी