By : Polticalface Team ,17-06-2023
एक जांभूळ दहा ते बारा रुपयाला मिळत असून, किलोचा दर साडेतीनशे ते चारशे रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे.
काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की,प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही! त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयापर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे एका किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर,भाजीमार्केट विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. महत्वाचे म्हणजे एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत.
यामुळे वाढले दर:
छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधव मंडीत सध्या जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपये मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा जांभळाची आवक कमी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे झाडाला लागलेल्या बारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात जोरदार वारा असल्याने बार गळून पडला होता. त्यामुळे बाजारात जांभळाची आवक कमी झाली आहे. त्यातच गावरान जांभूळ बाजारात येण्यासाठी आणखी एखाद्या आठवड्याचा वेळ आहे. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या जांभळाला चांगले दर मिळत आहे.
कंपन्यांची मागणी वाढली...
जांभळाचं उपयोग औषधी उत्पादनासाठी देखील केला जातो. विशेष म्हणजे शुगरसाठी आणि त्याच्या औषधी उत्पादनासाठी जांभळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून जांभूळ फळासाठी मागणी असते. तर अनेक शेतकऱ्यांकडून कंपनी थेट खरेदी करत असल्याने आणि कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी कंपनीलाच विकण्यासाठी प्राधान्य देतात. त्यात स्वतः कंपनी शेतात येऊन माल खरेदी करत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील वाचत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जांभूळ कंपनीत जात असून, बाजारात दिवसेंदिवस त्याची आवक कमी होत आहे. तर आवक कमी झाल्याने दर देखील वाढत आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक