राजकारणातील खरे मार्गदर्शक तर बेलवंडी आणि लोणी व्यंकनाथकर राजेंद्र नागवडे यांचा माजी आमदार राहुल जगताप यांना उपरोधक टोला

By : Polticalface Team ,18-06-2023

राजकारणातील खरे मार्गदर्शक तर बेलवंडी आणि लोणी व्यंकनाथकर

राजेंद्र नागवडे यांचा माजी आमदार राहुल जगताप यांना उपरोधक टोला लिंपणगाव( प्रतिनिधी)- तालुक्याच्या राजकारणात काम करत असताना आम्ही तुमचे मार्गदर्शक नव्हे तर आपले खरे मार्गदर्शक बेलवंडी व लोणी व्यंकनाथकर आहेत. त्यामुळे आम्ही तुमचे मार्गदर्शक कसे असू शकतो, असा उपरोधक टोला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी माजी आमदार राहुल जगताप यांना लगावला. कोळगाव येथील सेवा सोसायटी संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा बँक संचालक राहुल जगताप उभयंतांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी श्री नागवडे पुढे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील घनश्याम शेलार व अण्णासाहेब शेलार हे आता स्वतंत्रपणे राजकीय प्रवास करीत आहेत. तुमच्या सोबत काम करणारे बाळासाहेब नाहाटा हे उद्या तुमच्या सोबत राहतील अगर ना राहतील तुमचे तुम्हालाच माहित आहे. तालुक्याची आताची राजकीय परिस्थिती पाहता उद्याचा काळ तुम्हाला निश्चित चांगला जावो, आशा मिस्कील शब्दात श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की जे चाललंय ते अत्यंत चांगलं चाललं असून, येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, तालुक्यातील सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना प्रत्येकाला आधार देणे मग तो कोणताही प्रसंग असो, आपणा सर्वांचे ते आद्य कर्तव्य असल्याचे सांगत स्वर्गीय बापू आणि तात्या तालुक्याच्या विकासाबाबत वैचारिक व सकारात्मक निर्णय घेत असत या दोन्हीही नेत्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. हे तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे. त्यांचे अनुकरण करत आपणा सर्वांना चांगली काम करत पुढे जायचे आहे. अशा शब्दात राजेंद्र दादा नागवडे यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट मांडली. जिल्हा बँकेकडून कोळगाव सोसायटीला अथवा सभासदांना बँकेकडून कसल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगत, जिल्हा बँकेकडून ज्या प्रकारची मदत पाहिजे ती मदत प्रामाणिकपणे करण्याचे आश्वासन बँकेचे संचालक राहुल जगताप यांनी यावेळी ग्वाही देत ते आणखी पुढे म्हणाले की, कोळगाव सोसायटीचे कामकाज राजकारण विरहित चालावे, अशा शुभेच्छा यावेळी माजी आमदार जगताप यांनी यावेळी दिल्या. प्रास्ताविकात माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे यांनी संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा व आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा व उपस्थित मान्यवरां समोर मांडला. या कार्यक्रमास पुरुषोत्तम लगड, सुभाष शिंदे, सुभाष लगड, नितीन डुबल, बाळासाहेब नलगे, विश्वास थोरात, विनायक लगड, मच्छिंद्र नलगे, मधुकर लगड, विजय नलगे, नितीन मोहरे, मिठू शिरसाट, संतोष लगड, आर के लगड, सचिनराव लगड, नितीन नलगे, संतोष मेहत्रे, जालिंदर साबळे, बँकेचे तालुका विकास अधिकारी वसंत जामदार, संजय नलगे, गोरख घोंडगे, आबासाहेब लगड, विठ्ठल नलगे, अमित लगड, जीवन लगड, सतीश सावरकर, चंद्रकांत काटे, सुयश जाधव, नवनाथ मोरे, बाबासाहेब निर्मळ, उत्तम लगड, बाळा लगड, आदी कार्यकर्त्यांसह संस्थेचे आजी -माजी संचालक, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे चेअरमन नंदकुमार लगड यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष