काष्टीत येशू देवाची प्रार्थना करताना येऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याने अन्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,20-06-2023
श्रीगोंदा(प्रतिनिधी ) श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे धर्मांतरण करत असल्यानं दौंड च्या तीन महिलांवर गुन्हा दाखल झाले नंतर यातीन महिलांपैकी एक महिलेने साक्षीदार यांच्या घरात येशूदेवाची प्रार्थना करत असताना प्रतीक पाचपुते आणि त्याचे सहकारी यांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद श्रीगोंदा पोलीसात दिली असल्याने काष्टी येथील प्रतीक पाचपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काष्टी येथे एक वस्ती मध्ये घरात जाऊन ख्रिश्चन धर्माची प्रार्थना केली तर प्रश्न सुटलीत आणि कपाळावर तेल लावत आमच्या धर्मात या असे सांगितले ने तीन माहिलच्या वर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून याच प्रकरणातील एक महिलेने याबाबत एक तरुण त्याच्या सहकारी सह येऊन प्रार्थना करू नका म्हणत त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली असल्याने याबाबत गुन्हा दाखल झाला.
यात
शारदा आकाश सौंदाडे वय 27 व्यवसाय. सेल्समन रा. विघ्नेवस्ती दोंड जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून
प्रतीक पाचपुते रा. काष्टी ता. श्रीगोंदा व अन्य दोन तीन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही यांनी दिनांक रोजी रोजी सकाळी 11.00 वाजता काष्टी येथे फिर्यादी हे साक्षिदार सावित्री मदरे रा काष्टी यांचे घरी येशुदेवांची प्रार्थना करीत असताना प्रतीक पाचपुते याने तेथे जावून मी बजरंग दल चा अध्यक्ष आहे असे म्हणून त्याने फिर्यादी यांना जातीवाचक शब्द उच्चारून तुम्ही या जातीचे लोक हे आमच्या मराठा समाजाच्या लोकांचे धर्मपरीवर्तन का करता असे बोलून फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांना समजावत असताना आरोपी क्रं. 1 व 2 यांनी तुम्ही परत येथे आला तर तुम्हांला जिवे ठार मारू अशी धमकी देवून दमदाटी शिवीगाळ केली फिर्यादी हे परत रिक्षाने माघारी जात असताना आरोपी क्रं. 1 व 2 यांनी रिक्षा चालक यास तुम्ही फिर्यादीस रिक्षात बसविले तर रिक्षा जाळुन टाकू अशी धमकी दिल्लो वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट दिली।आहे.
वाचक क्रमांक :