रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पाठपुरावा सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिले निवेदन

By : Polticalface Team ,21-06-2023

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पाठपुरावा सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पाठपुरावा सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः सांगितले की दि 19 जून रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत बोललो व निवेदनही सादर केले.कुकडी प्रकल्पात करमाळा तालूक्यासाठी 5.5 टि एम सी पाणी राखुन ठेवण्यात आले. परंतु आजपर्यंत एकदाही हक्काचे 5,5 टि एम सी पाणी मिळाले नाही. प्रत्यक्षात केवळ 500 एम सी एफ टी एवढे सुध्दा पाणी मिळत नाही. यामुळे आता नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात यावी व यास मंजूरी देऊन अंदाजे 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जावा.नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन प्रकल्प हा आपला ड्रीम पोजेक्ट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखाना गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमा दरम्यान बोलताना तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये ठोस आश्वासन दिले आहे.या योजनेबाबत चिंता करु नका असे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे आता पुढील पाठपुरावा सुरु ठेवला असून शासकीय पातळीवर या योजनेसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजना मी कार्यान्वित केली. त्यावेळेपासून रिटेवाडीसाठी आपण प्रयत्नशील होतो. आता स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी या योजनेसाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी कागदोपत्री पुर्तता, मंजुरी, प्रत्यक्षात कार्यस्थळावर सर्वे, कॅबिनेटची मंजूरी, अर्थसंकल्पात तरतुद आदि सर्व प्रक्रिया होई पर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळून ही योजना कार्यान्वित झाल्यास करमाळा तालुक्यातील आणखी वाढीव क्षेत्र ओलिताखाली येईल. पाण्यापासून वंचित भागास या योजनेचा फायदा होणार आहे. यामुळे आपण ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावून प्रयत्न व पाठपुरावा करत राहणार असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न