By : Polticalface Team ,21-06-2023
करमाळा-प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची रविवारी मतमोजणी पार पडली आहे. या मतमोजणीमध्ये शेतकरी सभासदांनी बागल गटाला झुकते माप देऊन, आमच्यावर खुप मोठा विश्वास टाकला असल्याचे सौ.रश्मी बागल यांनी म्हटले आहे. स्व. मामांच्या विचारांवर आमचा गट काम करत असल्याचे भाकीत बागल यांनी केले आहे. खरे तर या विधानावर खुप मोठा प्रबंध सादर करता येऊ शकेल. कारण स्व. मामांनी कधी दुसऱ्यांच्या चुलीत पाणी ओतून स्वतःचे राजकारण केले नाही. परंतू तुम्ही मामांचे नाव घेता आणि दुसऱ्यांच्या चुली विझविण्याचे काम करता, त्याचप्रमाणे मामांकडे कधी कोणता ही व्यक्ती भेटण्यासाठी आला तर, मामानी जेवणाच्या ताटावरुन उटून त्याची भेट घेतली आहे. परंतू तुम्ही दोघे भाऊ-बहिण मामांचे नाव घेऊन दुसऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम करत आहात. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याची एकहाती सत्ता बागलांकडे मोठ्या विश्वासाने, कारखान्यांच्या सभासदांनी दिली होती. परंतू आदिनाथ कारखान्याची तुमच्या अवकृपेने वाट लागली. आणि आता मकाई कारखान्यामध्ये सुध्दा एवढा भ्रष्टाचार आणि एवढा झोलझाल करुन ठेवला आहे कि, त्याचे आता मापच राहिले नाही. सध्यातरी कारखान्यातील सर्व साखर विकून सगळा पैसा तुम्ही लंपास केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातला आहे. त्यांचे अद्यापपर्यंत एक रुपया सुध्दा बील तुम्ही अदा केले नाही. तुम्ही शेतकऱ्यांची बीले वेळेत अदा करु, म्हणून किती वेळा फेकाफेकी केली असेल याचे माप नाही. आणि तरी सुध्दा शेतकरी सभासद तुम्हाला मतदान करेल हे कसं शक्य आहे. आणि जर तुम्हाला शेतकरी सभासदांविषयी एवढे प्रेम ऊतू चालले असेल, तर आधी ऊसाची बीले अदा करा. आणि परत शेतकरी सभासदांची ऊसाची बीले रकडविल्यामुळे, माफी मागून येथून पुढे तरी आता कारखाना नेटाने चालवू असे म्हणून कानाला खडा लावा. त्याचप्रमाणे सध्याच्या बागल गटाच्या नूतन संचालक मंडळावर शेतकरी सभासदांनी जबाबदारी टाकली आहे. असे आपण वक्तव्य करता, मग याआधीचे निष्कामी संचालक मंडळ बेजबाबदार होते, हे आपण मान्य करता काय? अशा प्रकारचा मिश्किल टोला दशरथआण्णा कांबळे यांनी लगावला आहे.
तर पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, मतदानाच्या आधी तुम्ही किती जणांच्या गाठीभेठी घेतल्या? त्याचप्रमाणे किती ठिकाणी बोगस मतदान केले गेले? हे काही नवीन सांगायला नको. तुमच्यासाठी कुठल्या-कुठल्या गट प्रमुखांनी, सभासदांना दबावात घेऊन बागलांनाच मतदान करा! असे आदेश पारीत केले. आदेश देणारांचे सुध्दा निदान आपण आभार मानाल असे वाटले होते. परंतु असो तुमचा आधीच कारखानदारी आणि आमदारकीचा ठरलेला फॉर्म्यूला संपूर्ण तालूक्याने पाहिलेला आहे. त्यामुळे ९८०० मतदान झाले आणि त्यातील ८४०० मतदान तुम्हाला पडले असे म्हणता, तो सभासदांनी दाखविलेला विश्वास नाही. तर तालुक्याच्या बाहेरुन किती राजकिय वरदहस्तांनी, तुमच्या पॕनेलला मतदानातुन निवडून दिले आहे. हि संपूर्ण तालूक्यात सुरु असलेल्या चर्चेवरुन तुम्हाला समजत असेल. तुम्हाला जर एवढाच विश्वास तुम्ही केलेल्या विकासावर होता. तर होऊ द्यायची होती निवडणूक, कशाला वरिष्ठ पातळीवरुन राजकीय ताकद पणाला लावून विरोधकांचे चुकीच्या पध्दतीने अर्ज बाद करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले. जो मकाई सहकारी साखर बागलांना नीट चालविता आला नाही. तो कारखाना या नुतन संचालक मंडळाला चालविता येईल का? कारण या संचालक मंडळामध्ये बरेचसे असे हि संचालक आहेत, कि ज्यांचा ऊसाचा एक टिपरु सुध्दा आतापर्यंत कारखान्याला गेला नाही, अथवा त्यांच्याकडे एक गुंठाभर सुध्दा जमीन नाही. अशा संचालकांना तुम्ही चुकीच्या पध्दतीने संचालक मंडळामध्ये घेतले आहे. त्यामुळे तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही स्व. मामांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागणे बंद करा. कारण तुम्ही फक्त मामांच्या रक्ताचे वारस आहात, मामांच्या विचारांना तुम्ही केव्हाच तिलांजली दिली आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी सभासदांचे आभार मानण्यापेक्षा, तुमच्यासाठी ज्यांनी-ज्यांनी बोगस मतदान केले आहे त्यांचे आभार मानल्यास बरे होईल. असा टोला शेवटी दशरथआण्णा कांबळे यांनी लगावला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष