करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐकायचे आगळे वेगळे दर्शन एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाने घेतला निर्णय

By : Polticalface Team ,21-06-2023

करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐकायचे आगळे वेगळे दर्शन एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाने घेतला निर्णय करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा शहरात आज शांतता समितीची बैठक झाली यामध्ये मुस्लिम समाजाने ऐतिहासिक तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य राहील या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे येत्या 29 जुलै रोजी मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद तसेच हिंदू धर्माचा एकादशी हे महत्त्वाचे दोन सण एकाच दिवशी येतात यामुळे एकादशीसाठी करमाळा शहरातून महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या करमाळा शहरातून पंढरपूरच्या यात्रेकरिता जात असतात दिनांक 29 जून रोजी एकादशी असल्याने तसेच करमाळा शहरातून हजारो वारकऱ्यांची वर्दळ असल्याने मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा करीत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा ऐतिहासिक निर्णय सदर शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला

सदरची बैठक करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस कार्यालयात पार पडली यावेळी सदर बैठकीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सदरचा महत्वाचा निर्णय घेतला या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, कलीम काझी सर, उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अतिक वेग, मुस्तकीम पठाण, आझाद शेख, फारूक बेग, सोन्या चिवटे, माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, आयुब शेख, नागेश शेंडगे, फारुख जमादार, पत्रकार नाशिर कबीर, जिशान कबीर, सुरज शेख आदी मुस्लिम बांधव बहुसंख्य वर्गाने उपस्थित होते मुस्लिम समाजाने घेतलेला ऐतिहासिक निर्णयाचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत आहे

करमाळा शहरात गेली कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधव आपल्या वेगवेगळ्या सणात एकमेकांना बोलावून आपला आनंद द्विगुणीत करतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आजही मुस्लिम बांधवाबरोबर हिंदू बांधव देखील एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतात नवरात्र महोत्सव असो अथवा गणपती उत्सव किंवा रमजान ईद, मोहरम या सर्व सणात हिंदू मुस्लिम एकतेचे आजही करमाळा शहरात आगळेवेगळे दर्शन घडते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.