धरण उशाला,अन् कोरड घशाला,निष्क्रिय ग्रामपंचायत सदस्यांचा अजब कारभार....

By : Polticalface Team ,23-06-2023

धरण उशाला,अन् कोरड घशाला,निष्क्रिय ग्रामपंचायत सदस्यांचा अजब कारभार.... अहमदनगर(प्रतिनिधी :दादासाहेब जावळे )- गुंडेगावयेथील ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार पिण्याची पाण्याची समस्या व नागरी समस्या विरोधात गुंडेगाव येथील वार्ड क्रमांक ५ (पाच) मधील महिलांनी व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या तक्रारी बाबत माहिती मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या उपस्थितीत मांडली आहे. गुंडेगाव ग्रामस्थांच्या पिण्याचे पाणी,लाईट समस्या, स्वच्छता, घरकुल योजना तसेच गावातील रस्ते, बंद पथदिवे आदी समस्यांबाबत गेल्या तीन वर्षापासून ग्रामस्थ,महिला, शेतकरी वैतागले आहेत.हे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी ग्रामपंचायतचे सदस्य काहीच उपायोजना करत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला आहे. गावाला जिल्हा परिषद मार्फत पाच लाख रुपये खर्च करून शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेली चार महिन्यांपूर्वी आरो प्लांटची उभारणी पूर्ण झाली असून सुद्धा गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात नाही.तसेच पाणी पट्टी ही आकारली जात आहे पिण्याचे पाणी विकत घेऊन आमचे आर्थिक नुकसान होत आहे.गावाला खेटूनच मुख्य पाझर तलाव आहे या तलावामध्ये पूर्ण उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यात येईल एवढा पाणी साठा असून देखील सत्ताधारी लोकांनी जनतेचे हाल केले आहेत.जर या तलावातून जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी उपलब्ध करून गावाला पाणीपुरवठा घरोघरी झाला असता.गत तीन वर्षापासून एक वार्डात नव्हे तर पूर्ण गुंडेगावात समस्या व तक्रारी आहेत तसेच ग्रामपंचायत नियोजना अभावी आज गुंडेगावात पाण्याची समस्या ही उद्भवत आहे. पाणीपुरवठा योजना ही तांत्रिक प्रश्न नसून या पाईपलाईन साठी कुशल कामगारांचा वापर नसणे तसेच पाणी प्रेशरची दिशा चुकलेली आहे. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की जर माझ्या माता भगिनींना आठ-आठ पंधरा,महिनाभर पाणी मिळत नसेल तर या ग्रामपंचायत सत्ताधारी लोकांनी पदावर राहणे योग्य नाही.यांना सत्ता देऊन आम्ही एक प्रकारे विकासाची संधी दिली होती.परंतु यांना सत्तेत आम्ही जर विरोध केला असता तर हे बोलले असते की गावात बाळासाहेब हराळ का लक्ष घालत आहेत.म्हणून मी लक्ष घातले नाही परंतु जर माझ्या गावच्या जनतेचे अशा प्रकारे हाल होत असतील तर आता मला गावासाठी खऱ्या अर्थाने उतरावे लागेल.आज मोहरवाडी पाणी पुरवठा योजनेवर लक्ष देण्याची गरज आहे.आपल्या आघाडीच्या काळात ही योजना मंजूर झाली होती.योजनेसाठी साडे तीन कोटींची योजना असताना या योजनेसाठी साडे तेरा कोटी रुपये मंजूर करुन घेतले कारण भविष्यात ही योजना चांगली व्हावी परत या योजनेसाठी परत पैसे मिळणार नाही म्हणून आम्ही आग्रही भूमिका मांडत राहिलो. पुढील काळात आपण ग्रामसभा लावा प्रत्येक ग्रामसभेला मी उपस्थित राहील आज कोण काम करत आम्हाला घेणेदेणे नाही परंतु काम निकृष्ट होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज जनतेनी सत्ता बदलाचे परिणाम कसे सहन करावे लागत आहेत हे पाहत आहेत.या लोकांनी जर पाणी पुरवठा नाही केला तर आपण पदर पैसे भरून गावाला पाणी उपलब्ध करून देऊ.आज माझ्या बंधु भगिनींना लाईट पूर्ण वेळ देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.आम्ही सत्तेतून पायउतार झालो आम्ही जनतेचा कौल मान्य करुन काम करत होतो परंतु जो पर्यंत जनता जनार्दन म्हणत नाही तो पर्यंत आम्ही ही गावाच्या विकासात लक्ष घातले नाही.आज माझ्या या जनतेच्या म्हणण्यानुसार मी इथपर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहे. ज्या समस्या सोडवण्यासाठी आपण मला बोलावले आहे. सत्ताधाऱ्यांना गावची साधी लाईट सुद्धा दुरुस्त करता येत नाही.मोहरवाडी तलावातून जी पाईपलाईन आलेली आहे त्याकडे लक्ष देऊन करुन घ्यावी.एका वर्षात दलित वस्तीला ऐंशी लाख रुपये मिळू शकतात एवढा निधी उपलब्ध होऊ शकतो.गावात साधं बसायला समाज मंदिर नाही.आज गावात पाणी असताना तहान लागलेली माणसं पहायला मिळत आहेत.मनुष्य चुकतो कदाचित आम्ही ही चुकलो असू.या पुढील काळात आम्हाला लक्ष घालावा लागेल घन कचरा,सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३६ लाख रुपये येऊन पडले आहेत.यांना आलेला निधी खर्च करता येत नाही.मला तुला असे यांचे चालले आहे. गावातील पाणीपुरवठा, घरकुल, स्वच्छता,शिक्षण,या सर्वांची अवस्था खुप वाईट आहे येणाऱ्या पुढील ग्रामसभेला हे विषय मार्गी लावू.ज्यांना घरकुल नसेल त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी जिल्हाचे नेते श्री बाळासाहेब हराळ,श्री वामनराव जाधव गुरुजी तसेच ग्रामपंचायतचे मा.सरपंच तथा विद्यमान सदस्य संजय कोतकर,श्री सुनील भापकर,सेवा सोसायटीचे चेअरमन श्री छबुराव हराळ, चेअरमन चंद्रकांत निकम, व्हाईस चेअरमन संदीप भापकर , शिवनाथ कोतकर, संदिप जाधव,तसेच सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व सर्व सदस्य यांना निमंत्रित केले होते.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यामध्ये रेखा लष्करे,अर्चना जावळे, अलका जावळे, ज्योती जावळे,शितल देवकर, मनिषा जावळे,पुजा मुदगुले,सुशिला सकट,माया सकट, सुशिला दादा सकट, हिराबाई माने,आरती मुदगुले, सविता मुदगुले,विद्या लष्करे,शितल कुसळकर, सविता कुसळकर,लता राऊत आदी महिला उपस्थित होत्या. नागरिकांमध्ये शिक्षक रमेश चौधरी, रावसाहेब हराळ गुरुजी, संजय येठेकर, दादासाहेब आगळे,अनिल हराळ मेजर, आप्पासाहेब जाधव, नंदकुमार माने, ज्ञानदेव कुसळकर, राजेंद्र राऊत, साईनाथ मोहिते, राजेंद्र मोहिते, अमोल कुसळकर, विकास हराळ,अनिल सकट,सचिन सकट,संजय मोहिते,छगन येठेकर मेजर, भाऊसाहेब शिंदे, डॉ.विलास सकट,दादासाहेब जावळे,पापाभाई तांबोळी, साहेबराव सकट, रमेश माने, प्रदिप पवार, रामदास कुताळ, पोपट तांबे, रामदास कोतकर, उत्तम कुसळकर, संतोष जावळे,कुताळ संजय,मयुर हराळ,विजय माने, प्रसाद लंके,गोरख ढवळे,राजू तांबोळी, मयूर जाधव, अनिल भापकर,मोहन सातपुते,भरत सोनवणे, सचिन कुताळ,सुभाष भापकर, अंकुश कुताळ,नारायण भापकर, गणेश भापकर, मंगेश हराळ, विनोद दवणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली चार महिन्यांपासून सुरू आहे.सांडपाणी व्यवस्था नाही,कधीतरी पाणी रात्री दोन वाजता अचानक सोडले जाते.पाणी सुटलेले माहीत होत नाही.त्यामुळे पाण्याची टंचाई येऊन पाणी विकत घ्यावे लागते यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.संरपच, सदस्य यांना याबाबत लवकरात लवकर उपायोजक करून पाण्याची व्यवस्था करावी.. अर्चना जावळे (महिला ग्रामस्थ,गुंडेगाव)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष