विद्यालयमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात योग दिनाचे उत्साहात प्रात्यक्षिके

By : Polticalface Team ,23-06-2023

विद्यालयमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

   श्री व्यंकनाथ विद्यालयात योग दिनाचे उत्साहात प्रात्यक्षिके श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी २१ जून रोजी तालुक्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रामुख्याने श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था या शिक्षण संस्थांतील सर्व विद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याबरोबरच तालुक्यातील अन्य शिक्षण संस्थातील विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व याविषयी अनुभवी योगाभ्यासकांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवली. विद्यार्थ्यांनी देखील मनमोरात योग साजरे केले. याप्रसंगी सर्वच विद्यालयात, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी योग दिनाच्या प्रतिज्ञा अंगी बाळगत पुढे म्हटले आहे की, मी कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन कदापि करणार नाही, मी कोणत्याही हिंसात्मक कार्यात भाग घेणार नाही, मी अशील शब्दप्रयोग करणार नाही अशील साहित्य वाचणार नाही व अशील चित्र पाहणार नाही, मी परीक्षेत कॉपी करणार नाही, मी झाडे तोडून प्रदूषण वाढवणार नाही, मी आई वडील पालक व गुरुजनांचा आदर राखील अशा प्रार्थना योग दिनाच्या प्रारंभ करून प्रत्येकाने शपथ घेतली. यावेळी सकाळच्या प्रारंभी उत्साही व आनंदी वातावरणात योग दिनाचे महत्त्व याविषयी सर्वच विद्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. दरम्यान तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये योगाभ्यासक प्राचार्य दत्तात्रेय सस्ते, शिवाजीराव पांडव, अर्जुनराव कुलांगे आदी योगाचार्यांनी विविध प्रकारचे योगासने विद्यार्थ्यांसमवेत अगदी आनंदी वातावरणात करून दाखवली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देत प्रात्यक्षिकांचा स्वीकार करत योगासने केली. याप्रसंगी जेष्ठ योगाचार्य प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी योग दिनाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर योगासने करावीत, त्यातून शरीराला मोठी ऊर्जा मिळते, शरीर तंदुरुस्त राहते, विविध आजारापासून मुक्तता मिळते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सूर्यनमस्कार करून दररोज योगासने करावीत. जीवन खूप सुंदर आहे. शरीर देखील मोठे मौल्यवान आहे. आपण जेवढे शरीराला सांभाळाल तेवढे आयुष्य देखील उत्तम प्रकारे वाढले जाते. व्यसनापासून प्रत्येकाने दूर देखील राहिले पाहिजे, आहारात पालेभाज्यांचा जास्त करून समावेश करावा भाजीपाल्यांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे जास्त करून आहारामध्ये भाजीपाले असावीत असे सांगून विद्यार्थ्यांना प्राचार्य सस्ते, पांडव आणि कुलांगे आदी योगाचार्यांनी विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त भरीव असे मार्गदर्शन केले. तदनंतर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी