श्रीगोंदा प्रतिनीधी:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव येथे इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी दीपांशू दीपक सोनवणे याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर साठी नुकतीच निवड झाली आहे
दीपांशूच्या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक दीपक सोनवणे शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर, विठ्ठल सोनवणे सर, पालकर सर , गोधडे सर व कदम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले दीपांशू या विद्यार्थ्याला शिक्षण विस्तार अधिकारी बोरुडे साहेब तालुका गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब शेडगाव गावच्या सरपंच संध्याताई शेंडे उपसरपंच पार्वतीबाई गवळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय शेंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिभीषन राऊत उपाध्यक्ष भोसले ताई व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :