गुरुजी लॅब आणि शिलेदारांचा सन्मान
अग्नीपंख फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम
By : Polticalface Team ,24-06-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) =- आयुष्य भर पाषाणाची संघर्ष करणारी माता स्व मालनबाई धोंडीबा काकडे यांचे स्मरणार्थ अग्नीपंख फौंडेशनने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात बसविलेल्या गुरुजी इलेक्ट्रॉनिक लॅब लोकार्पण आणि स्पर्धा परिक्षेत बाजी मारणाऱ्या शिलेदारांचा लोणीव्यंकनाथ येथे भव्य सन्मान करण्यात आला.
लोकार्पण व गुणवंत्तांचा सन्मान नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, उद्योजक संजय उंडे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते.
यावेळी महेश जंजीरे, प्रियंका शिंदे, किरण वागस्कर, प्रशांत दरेकर, प्रताप पवार यांची भाषणे झाली.
यावेळी रामदास झेंडे, रावसाहेब काकडे, डी आर काकडे, जिजाबापू शिंदे, विलास काकडे, गणपतराव काकडे, उद्योजक लखन नगरे, सुनील पाटील, पोलीस पाटील मनेश जगताप, शिवदास शिंदे, शुभांगी लगड, अंकुश घाडगे, किसन वऱ्हाडे, विठ्ठल वाबळे, बंडू खंडागळे, विजय त्रिंबके, बापुसाहेब ढवळे, डॉ संतोष ओव्हळ, हनुमंत जगताप, राहुल गोरखे, सुनील धुमाळ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले की, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने अग्नीपंख फौंडेशनने शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय काम चालविले, गुणवंतांचा गौरव करुन इतरांना प्रेरणा देण्याचे काम ही काळाची गरज आहे. पण त्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रत्येकाच्या अंगी जिद्द, चिकाटी असावी, यशाचा मार्ग आपोआप मिळतो असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, श्री व्यंकनाथ विद्यालयात इलेक्ट्रॉनिक लॅब सुरु केले हे कौतुकास्पद आहे. असे नागवडे यांनी यावेळी म्हटले आहे.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविले. भविष्यात आणखी काम करण्याची गरज आहे.
गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील गुणवत्ता सुधारत आहे. भविष्यात निश्चितच चांगले रिझल्ट येतील.
प्रास्ताविक प्रा संजय लाकूडझोडे यांनी केले.
सुत्रसंचालन शिवाजी इथापे यांनी तर आभार प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी