एक व्यक्ती एक वृक्ष, लागवड करून रामेश्वर दरेकर यांनी झाडांची रोपे देऊन राबवला उपक्रम (योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,25-06-2023

एक व्यक्ती एक वृक्ष, लागवड करून रामेश्वर दरेकर यांनी झाडांची रोपे देऊन राबवला उपक्रम (योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील कै. शिवाजी परसराम दरेकर यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त दै. बुलंद शक्तीचे मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी गावात प्रत्येक घरोघरी झाडांची रोपे देऊन एक व्यक्ती , एक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्पाचे दुसऱ्या वर्षीही आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला. विषेश म्हणजे , प्रथम पुण्यतिथीनिमित्त लावगड केलेल्या झाडांची झालेली वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. वडिलांच्या हयातीत देखील रामेश्वर शिवाजी दरेकर हे वृक्षारोपण दरवर्षी नित्य नियमाने करत होते; वडिलांच्या निधनानंतर देखील यात खंड पडू दिला नाही.अनेक जातीचे वटवृक्ष उंच उंच वाढली आहे. झाडाबाबतीत असलेले प्रेम हे गावकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून प्रत्येकांनी जर वृक्षरोपण करण्याबरोबरच वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो, असे मत दै. बुलंद शक्ती संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी व्यक्त केले.

कै. शिवाजी दरेकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि विचार रामेश्वर दरेकर जपत असून व्दितीय पुण्यतिथी निमीत्ताने लिंबूनी, कढीपत्ता, सिताफळ, मोगरा, पेरु ,वड पिंपळ इत्यादी वटवृक्षाची झाडे वझर सरकटे येथे वाटप करण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर वडिलांची आठवण वटवृक्षाचे संगोपन करुन पर्यावरण समतोल अबाधित ठेवून जपावी पशुपक्षी देखील वटवृक्ष असतील तर यांची लोकसंख्या वाढु शकते अन्यथा पक्षुपक्षी देखील कालबाह्य होतील. उन्हापासुन सुरक्षा झाडापासून मिळते ,पाऊस देखील झाडामुळे पडतो, शुद्ध हवा आपल्याला या झाडामुळे मिळते शुध्द हवेचे महत्त्व कोरोनात निधन झालेल्या लोकांना माहित आहे यामुळे जगण्यासाठी हवा अत्यंत उपयुक्त आहे या साठी वटवृक्ष जगवणे यांची निगा राखणे हे गरजेचे आहे असे मत रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी वयक्त केले. यावेळी ‌ आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष