माध्यमिक सोसायटीचे शिक्षक पुरोगामी मंडळ सभासदांच्या सदैव पाठीशी राहील- शिक्षक नेते प्रा भाऊसाहेब कचरे

By : Polticalface Team ,27-06-2023

माध्यमिक सोसायटीचे शिक्षक पुरोगामी मंडळ सभासदांच्या सदैव पाठीशी राहील- शिक्षक नेते प्रा भाऊसाहेब कचरे
लिंपणगाव (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीचा कारभार पुरोगामी शिक्षक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कमी व्याजदरात तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुरोगामी शिक्षक मंडळाने घेतला. यापुढेही सदैव पुरोगामी शिक्षक मंडळ सभासदांच्या पाठीशी खंबीर उभे राहील अशी ग्वाही पुरोगामी शिक्षक मंडळाचे नेते व माध्यमिक सोसायटीचे मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे यांनी घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात सदिच्छा भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीपराव काटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील विविध विद्यालय व महाविद्यालयांना सदिच्छा भेट देऊन आभार दौरा आयोजित केला होता. यावेळी यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव या विद्यालयात मुख्याध्यापक व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांनी संस्थेचे मार्गदर्शक व शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे व सोसायटीचे नूतन चेअरमन दिलीपराव काटे यांचा यावेळी सन्मान केला. यावेळी बोलताना संस्थेचे मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे पुढे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून माध्यमिक सोसायटीचा कारभार पुरोगामी शिक्षक मंडळाचे नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांच्या अधिपत्याखाली चालू आहे. संस्थेचा कारभार पाहत असताना वेळोवेळी व्याजदर कमी करून सभासदांच्या हितासाठी अवघ्या सात टक्क्याने संस्थेचे कर्ज सभासदांना दिले जाते. त्यामध्ये तात्काळ कर्ज मंजुरी देत असतानाच पुरोगामी शिक्षक मंडळ हे संस्थेचा पारदर्शी असा कारभार करत असताना कोणत्याही सभासदांची अडवणूक केली जात नाही. संस्थेने आतापर्यंत नऊशे कोटीच्या पुढे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा कारभार हा राज्यात प्रेरणादायी ठरला आहे. असे सांगून प्रा कचरे पुढे म्हणाले की, कर्ज घेत असताना ज्या सभासदांना अडचण येत असतील त्यांनी आमच्याशी थेट संपर्क करावा. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, सभासदांचा देखील पुरोगामी शिक्षक मंडळावर मोठा विश्वास निर्माण झाल्याने सभासद देखील आमच्या कारभारावर खुश आहेत. त्यामुळे आम्ही देखील यापुढेही सदैव सभासदांच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही प्रा कचरे यांनी दिली. या सदिच्छा भेटीदरम्यान संस्थेचे चेअरमन दिलीपराव काटे यांनी माध्यमिक सोसायटीचे मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे व संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून संस्थेचा कारभार पाहण्याची संधी दिली. निश्चितपणे संस्थेचा कारभार पाहत असताना संस्था व सभासद हिताला अधिक प्राधान्य देऊ, अशी ग्वाही देखील चेअरमन दिलीपराव काटे यांनी बोलताना यावेळी दिली. यावेळी माध्यमिक सोसायटीचे नूतन चेअरमन दिलीपराव काटे व सोसायटीचे मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील रामेश्वर विद्यालय, घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पिंपळगाव पिसा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, कुकडी एज्युकेशन सोसायटीचे रेणुका माता विद्यालय पिंपळगाव पिसा, पारगाव येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय, लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येळपणे येथील खंडेश्वर विद्यालय चिंभळा येथील चिंभळा माध्यमिक विद्यालय या विद्यालयांना श्री चेअरमन दिलीपराव काटे व संस्थेचे मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे यांनी सदिच्छा भेटी दिल्या. आभार दौऱ्या प्रसंगी भेटी दरम्यान विद्यालयात या दोन्हीही मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी