बेहत्तर भारत की बनिया उपक्रम पोस्टरचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन
By : Polticalface Team ,27-06-2023
लिंपणगाव( प्रतिनिधि):"बेहतर भारत की बूनियाद" उपक्रम पोस्टरचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरत यांच्या हस्ते झाले प्रकाशन.
आज अहमदनगर येथे जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व विधानसभा अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला व जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती जाणून घेतली तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या "बेहतर भारत की बुनियाद" या उपक्रमाच्या पोस्टरचं प्रकाशन केले.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रदेश सचिव दिप चव्हाण, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख, प्रदेश सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष विशाल कळमकर व मयूर पाटोळे यांच्यासह युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :