श्रीगोंदा तालुक्यातून आ. पाचपुते यांच्या modi@9 बाईक रॅली.
By : Polticalface Team ,27-06-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यशस्वीरित्या ९ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने modi@9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवार दि.२६/०६/२०२३ रोजी करण्यात आले होते. या बाईक रॅलीस तालुक्यातील युवा वर्गाने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. रॅलीची सुरुवात काष्टी येथील आ. पाचपुते यांच्या निवासस्थानापासून होऊन ढोकराई-मढेवडगाव-लोणी व्यंकनाथ- पारगाव मार्गे श्रीगोंदा शहरातील आ. पाचपुते यांच्या माऊली संपर्क कार्यालयात रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये देशभक्तीपर व मोदीजींची गाणी वाजत होती.
बाईक रॅलीमध्ये आ.पाचपुते यांचे दोन्ही सुपुत्र विक्रमसिंह व प्रतापसिंह सहभागी झाल्यामुळे तरुणांमध्ये नवा जोश निर्माण झाला होता.रॅलीचे योग्य नियोजन करत कुठल्याही प्रकारे अतीउत्साहात काही गालबोट लागणार नाही, प्रत्येकजण सुरक्षित पोहचेल याची काळजी घेतली गेली. सकाळी ०९.३० ला चालू झालेल्या रॅलीची सांगता तब्बल ३ तासानंतर १२.३० वाजता श्रीगोंदा येथे करण्यात आली.
यावेळी सांगता सभेत बोलताना श्री.विक्रमसिंह पाचपुते म्हणाले कि,या बाईक रॅलीचा मुख्य हेतू मोदी सरकारच्या लोकहिताच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे. यानंतर त्यांनी विविध योजनांची माहिती जमलेल्या कार्यकर्त्यांना देत तुम्ही हि माहिती आपआपल्या गावामध्ये गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे आवाहन केले.
आ.बबनराव पाचपुते यांनी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यशस्वीरित्या ९ वर्षे पूर्ण करत जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल केले आहे. या ९ वर्षात मोदी साहेब फक्त भारताचे पंतप्रधान नसून जागतीक नेते झाले आहेत. त्यांच्या कामाचा वेग प्रचंड असून भारत देश त्यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये नंबर एकचा विकसित देश झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तसेच तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या विकास कामांची माहिती कार्यकर्त्यांना दिली.
रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी केले, सूत्रसंचालन युवा मोर्चा अध्यक्ष नितीन नलगे यांनी तर आभार महिला आघाडीच्या कार्यअध्यक्षा शुभांगी सप्रे यांनी मानले.
वाचक क्रमांक :