राष्ट्रगीत, तिरंगा ध्वजाला विरोध करणाऱ्या मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा: उत्तरेश्वर कांबळे
By : Polticalface Team ,28-06-2023
करमाळा प्रतिनिधी: सतत वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी मिळण्यासाठी खटाटोप करणारे भिडे प्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनी तर आकलेचे तारे तोडले आहेत काल पुण्यातील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यदिन साजरा करू नका ,तिरंगा ध्वजात पांढरा, आणी हिरवा रंग कशासाठी?याच कार्यक्रमात देशाच्या फाळणी वरून मुस्लिम समाजाच्या वर टिका केली आहे. महात्मा गांधी यांच्यावर अपमानास्पद टिका केली आहे.असे देशद्रोही विधान केले असुन या विधानाबद्दल संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.
भाजप सरकार सत्तेवर असल्यास भिडे वारंवार बेताल वक्तव्य करत असतात मनोहर भिडे यांच्यावर पन्नास पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन 12 तडीपारीचे आदेश पडून आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही.ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे.असे देखील उत्तरेश्वर कांबळे म्हणाले
वाचक क्रमांक :