शेडगाव फाटा ते टाकळी कडेवळीत डांबरीकरन रस्त्या अवघ्या अठवड्या भरातच उखनला.
By : Polticalface Team ,28-06-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव फाटा ते टाकळीकडेवळी या नवीन रस्त्याचे काम पावसाळ्या पूर्वीच डांबरीकरण केलेला रस्त्या अवघ्या पाच ते सहा दिवसातच उखनला असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाचा दर्जा ढासळला असून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर संशय निर्माण झाला आहे. ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेडगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ते टाकळी कडेवळी हा सुमारे ५ किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आला होता. तालुक्यातील टाकळी कडेवळी ,शेडगाव तसेच सिद्धटेक राशीन अशी महत्त्वाची गावे या रोडवर आहेत या मार्गांवर जास्त वाहतूक होत असल्यामुळे रहदारीसाठी रस्त्याचा वापर होतो. शेडगाव ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलावून रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याचे व निकृष्ट प्रकारचे होत असल्याचे निदर्शनास आणून काम बंद करण्यास भाग पाडले. रस्ता तयार करून अवघे पाच- सहा दिवसातच रस्ता उखडला आहे या रस्त्यावर डांबरीकरण झाल्यावर रस्त्या उखनल्यामुळे ग्रामस्थांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने कोटीवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला रस्ता खराब होत असेल तर कामाचा दर्जा तपासण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी बनविलेल्या रस्ता उखडला जात असेल तर दरवर्षी नवे रस्ते तयार करावे लागतील कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता एकाच पावसाळ्यात उखडला असेल तर कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ट असल्याची शंका निर्माण होते कामाचा दर्जा तपासून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी होताना दिसत आहे
वाचक क्रमांक :