मुस्लिम मताच्या वोट बँकेसाठी दंगा भडकवणारे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय पासून सावधान राहावे, मुस्लिम समाजाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आव्हान

By : Polticalface Team ,29-06-2023

मुस्लिम मताच्या वोट बँकेसाठी दंगा भडकवणारे
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय पासून सावधान राहावे,

मुस्लिम समाजाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आव्हान
करमाळा प्रतिनिधी देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने स्वतःचे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले भारताने सर्व दम सर्व धर्म समभाव जपत सर्व धर्मांना एकत्र घेऊन राष्ट्र निर्माण केले हिंदू मुस्लिम समाजात दंगा लावून आपली मताची पोळी भाजून घेण्याचे काम आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी केली असून या जातीवादी पक्षापासून आपण सावधान राहावे असे आव्हान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले गेली पंधरा वर्षापासून करमाळा शहरातील उर्दू शाळेला नववी व दहावीची वर्ग वाढवूनमिळण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून होता एकही राजकीय नेते मंडळीला हा प्रश्न सोडवता आला नाही मात्र राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी अवघ्या तीन महिन्यात या वर्ग वाढीला मंजुरी देऊन करमाळा शहरातील उर्दू शाळेत शिकणाऱ्या विशेषता मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे सकल मुस्लिम समाज करमाळा तालुक्याच्या वतीने केसरकर यांचा सत्काराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे समाजाचे अध्यक्ष उस्मान तांबोळी कलीम काजी शौकत भाई नालबंद अहमद चाचा कूरेशी फारुख भाई जमादार फारुख बेग इरफान सय्यद पत्रकार नाशिक कबीर पत्रकार अश्फाक सय्यद पत्रकार अलीम शेख आधी मुस्लिम समाजाचे सर्व नेते मंडळी विकास मंडळाचे अध्यक्ष विलास घुमरे उपस्थित होते बोलताना नामदार केसरकर म्हणाले की हिंदुस्थानाच्या भूमीवर प्रेम करतो तो प्रत्येक माणूस हा भारतीय नागरिक आहे आज मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या असून या योजना देत असताना कुठलाही जातिभेद केला जात नाही समाजातील तरुण-तरुणींनी शिक्षण घेऊन आपली प्रगती केली पाहिजे महाराष्ट्र सरकार सध्या दहा भाषेतून शाळा चालू असून उर्दू शाळा तेवढीच महत्त्वाची आहे उर्दू ही मातृभाषा असल्यामुळे समाजाच्या विद्यार्थ्यांना या भाषेचा फायदा होऊन चांगले मार्क मिळू शकतात उर्दू शाळेतून शेवटपर्यंत शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करणार असून आज या शाळेला वर्ग वाढ असून येणाऱ्या काळात या शाळेला शिक्षक ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले या उर्दू शाळेचे वर्ग वाढ साठी प्रयत्न करणारे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नेते इरफान भाई शेख यांनी नामदार केसरकर यांचे आभार व्यक्त केले उस्मान शेठ तांबोळी गेली पंधरा वर्षांपासून आमचा हा प्रश्न प्रलंबित होता अनेक नेते मंडळी आली गेली अनेक शासन आले गेले पण कोणीही आमचा प्रश्न मार्गी लावला नाही मात्र दीपक दीपक केसरकर साहेब यांनी आमच्या भावना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून ऐकून घेतल्या आमचा प्रश्न मार्गी लावला याबद्दल आम्ही आभारी आहोत पुढे करमाळ्यातील हिंदू मुस्लिम एकत्रितच राहणार असून उद्या येणाऱ्या बकरीसाठी कुठेही आषाढी वारीमुळे कुर्बानी दिली जाणार नाही असे सांगितले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.