पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेशाची संधी प्रा. रामदास झोळ

By : Polticalface Team ,29-06-2023

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेशाची संधी प्रा. रामदास झोळ करमाळा प्रतिनिधी: ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला काही कारणास्तव जर प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला देखील प्रवेशाची संधी असते अशी माहिती स्वामी चिंचोली ( भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली. मागील काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याची संख्या जास्त असते परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा असल्याने विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतो किंवा नोकरी करण्याचा पर्याय निवडतो. परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांला पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल तर सदर विद्यार्थ्यांला सीईटी प्रवेश परिक्षा न देता देखील पदविका अभ्यासक्रमाच्या मार्कावर (कमीत कमी ४५ टक्के व ४० टक्के मार्क मागासवर्गीय उमेदवारासाठी) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेश घेता येतो यासंबंधीची माहिती अनेक पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदवी अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. सध्या अशी परिस्थिती कॉम्प्युटर व आयटी या शाखांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेली आहे, मागील दोन वर्षात म्हणजेच कोरोनाचा काळ संपल्यानंतर कॉम्प्युटर व आयटी या शाखांना प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता पुर्णपणे भरलेली जात असुन कॉम्प्युटर व आयटीच्या थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत कमी जागाच प्रवेशासाठी शिल्लक राहत आहेत असे ते पुढे म्हणाले. तरी ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा व सध्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. ०३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी