लिंपणगाव मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,29-06-2023

लिंपणगाव मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा उत्साहात साजरा लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी या देवतांची संपूर्ण गावातून आषाढाी एकादशी निमित्त टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी पालखी सोहळा आयोजित केला होता. दरम्यान लिंपणगाव येथे विठ्ठल रुक्मिणीचे पुरातन मंदिर असून, प्रत्येक आषाढी एकादशी निमित्त गाव परिसरातील भाविक भक्त एकत्र येत सालाबाद प्रमाणे पालखी सोहळा आयोजित करतात. पालखी सोहळ्यातून पांडुरंग आपल्या दारी येणार असल्याने प्रत्येक घरासमोर महिला मंडळींनी सडा रांगोळ्या काढून विठ्ठल रुक्मिणी मातांचे जोरदार स्वागत केले.. विशेष म्हणजे दिवंगत ह. भ. प. बापूं अण्णा कुरुमकर यांच्या संकल्पनेतून पन्नास वर्षापासून हा आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा आज अखेर गावातील प्रतिष्ठित नागरिक व भजनी मंडळांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे आज गावामध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्या दरम्यान प्रति पंढरपूर आहे अशा स्वरूपात लिंपणगाव पंचक्रोशीत भक्तिमय असे वातावरण दिसून आले.

निश्चितच आषाढी एकादशी म्हटले की, पांडुरंगाची आठवण येते. त्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच श्री नामाचा गजर लिंपणगाव पंचक्रोशी होताना दिसला. गावामध्ये कोणताही धार्मिक उत्सव असो अशावेळी लिंपणगाव पंचवटीतील सर्व ग्रामस्थ पक्ष मतभेद बाजूला ठेवत या धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होतात. तसेच गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरातील पंचक्रोशी सह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज व पंढरीच्या पांडुरंगाला भाविक व शेतकऱ्यांनी भरपूर पावसासाठी मोठे साकडे घातले. आषाढी एकादशी निमित्त सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर मित्र मंडळाने सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शना निमित्त आलेल्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप केले.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात लिंपणगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून समजले जाते. गावचा विस्तार हा सहा वाड्या आणि गाव असा मिळून ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. त्यामुळे लिंपणगावला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गावांमध्ये सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरासह विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील पुरातन काळातील असून, या मंदिराची मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी समोर येताना दिसते. श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराची पुरातत्त्व विभागाकडे नोंद असून, तीन दिवसांपूर्वीच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर मंदिर स्थळी भेट देऊन मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव, सरपंच शुभांगी ताई जंगले व ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ इत्यादींसमोर सखोल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराचा नुकताच क वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यात आल्याने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कोट्यावधीच्या दरम्यान निधी उपलब्ध झाल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सभोवताली उत्कृष्ट असे बांधकाम देखील सुरू झालेले आहे. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील हेमाडपंती असून, या मंदिराच्या देखभाली साठी शासनाने आरक्षित केलेली असून ,संबंधित कुलकर्णी नावाच्या व्यक्तीकडे सदर जमीन वहिवाटीसाठी आहे. गावातील या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देखील क वर्ग दर्जा मधून जीर्णोद्धार व्हावे अशी अपेक्षा लिंपणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक भक्तांमधून व्यक्त केले जात आहे. एकूणच संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी आषाढी एकादशीनिमित्त आनंदी वातावरणात पालखी सोहळे आयोजित करण्यात आले होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.