पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांनी संस्थेचा आदर्श व पारदर्शी कारभार करून राज्यात नावलौकिक वाढवला - नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

By : Polticalface Team ,03-07-2023

पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांनी संस्थेचा आदर्श व पारदर्शी कारभार करून राज्यात नावलौकिक वाढवला 
- नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे लिंपणगाव (प्रतिनिधी)- पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सभासदांच्या हिताबरोबरच संस्थेचे अस्तित्व कायम राखले. म्हणूनच संस्था राज्यात नवलौकिकास पात्र ठरली. असे गौरवदगार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी काढले. दिलीपराव काटे यांची नुकतीच संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्यानंतर प्रथमच श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नूतन चेअरमन दिलीप काटे व नूतन व्हॉइस चेअरमन संजय कोळसे यांच्यासह उपस्थित संचालक मंडळाचा श्री नागवडे यांनी नागरी सन्मान केला. यावेळी बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, शिक्षक नेते प्रा भाऊसाहेब कचरे यांनी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सतत सभासदांच्या हित डोळ्यासमोर ठेवून कारभार पाहिला. पंचवीस वर्षांपूर्वी संस्थेच्या कर्जाचा व्याजदर 18% वर पोहोचला होता. तो आज अखेर सात टक्क्यावर आणला केवळ नफा म्हणून न पाहता सभासदांचा आर्थिक फायदा कसा होईल याकडे प्रा कचरे यांनी लक्ष केंद्रित केले. हा आदर्श त्यांनी संस्था चालवताना दाखवला म्हणूनच ही संस्था राज्यात एक आदर्श संस्था म्हणून पाहिली जाते. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की प्रा कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने आज अखेर 980 कोटी इतके कर्जवाटप केले. त्यातून कमीत कमी व्याजदर हाच उद्देश संचालक मंडळाचा असल्याने निश्चितपणे सभासदांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद अशी बाब म्हणावे लागेल. सहकारी संस्था कशी चालवावी हा आदर्श प्रा कचरे यांच्याकडून प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. असे सांगून श्री नागवडे यांनी प्रा कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कारभाराचे भरभरून कौतुक केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक काकासाहेब घुले यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील शहीद जवान झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना माध्यमिक संस्थेकडून यापूर्वी 51 हजार मदत देण्यात येत होती. परंतु त्यामध्ये वाढ करून ते आता एक लाख रुपये करण्यात आली आहे. असे सांगून श्री घुले आणखी पुढे म्हणाले की, संस्थेच्या विविध योजनांची माहिती सांगत ते म्हणाले की, प्रा कचरे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या मुला मुलींसाठी पुरोगामी कन्यादान योजना राबवली जात असून, त्याचा संस्थेच्या सभासदांना मुला मुलींच्या विवाह प्रसंगी मोठा हातभांर लागत आहे. संस्थेचा कारभार पाहत असताना नफा मिळवणे हा उद्देश नसून कमी व्याज दराने सुलभ कर्ज वाटप कसे होईल याकडे संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी सत्काराला नंतर बोलताना संस्थेचे चेअरमन दिलीपराव काटे यावेळी म्हणाले की, पंचवीस वर्ष संस्था ही प्रा भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पणे कारभार करत असून, सहकारामध्ये जर एकसूत्री नेतृत्व असेल तर निश्चितपणे संस्थेची निश्चितपणे चांगली प्रगती होते. त्याचे उदाहरण म्हणून प्रा भाऊसाहेब कचरे होय. त्यानुसार शिक्षक नेते प्रा कचरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ हे सतत संस्था व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करत असल्याने सभासदांचाही प्रा कचरे यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास असल्याचे चेअरमन श्री काटे यांनी यावेळी सांगितले. या सत्कार समारंभास नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके, संदीप औटी, काष्टी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाचपुते, बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे, माध्यमिक सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय कोळसे, संस्थेचे संचालक सर्वश्री सूर्यकांत डावखर, काकासाहेब घुले, ज्ञानेश्वर काळे, सुरेश मिसाळ, सत्यवान थोरे, प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी, धोंडीबा राक्षे, प्राचार्य जावळे सर, नितीन कराळे, संचलिका श्रीमती मनीषा म्हस्के, श्रीमती आशा कराळे, नंदकुमार दिघे, संस्थेचे सचिव स्वप्नील इथापे, विलास शितोळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शितोळे, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, महादेव मोहिते, विठ्ठल बुनगे, मारोतराव घुले, कारखान्याची अधिकारी वारुळे, शाखाधिकारी श्री चौगुले, कानिफनाथ तुरकुंडे, स्वप्निल पवार आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे यांनी केले. आभार भास्कर जगताप यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.