श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक विद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,03-07-2023

श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक विद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात सोमवार दिनांक 3 जुलै रोजी प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्वच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचा गुरुपौर्णिमा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक विद्यालयात दत्तात्रय महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून वर्षभरामध्ये शालेय शिक्षण घेत असताना चांगली सुबुद्धी द्या, सर्वांना सुखात आनंदात व ऐश्वर्या ठेवा. अशा अंतकरणपूर्वक प्रार्थना करत विद्यार्थ्यांनी गुरु शिष्याचे किती अतूट नाते आहे. हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिक्षकांनीही गुरु शिष्य यांचे परंपरागत असलेले नाते यावेळी विशेष केले.

दरम्यान तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते.

या आयोजित कार्यक्रमात विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरु साक्षात परब्रम्ह म्हणत दत्त दिगंबरांना वंदन करत गुरु म्हणजे जीवनाला प्रकाश देणारे असून, गुरुशिवाय कोणतेही सत्कार्य अगर जीवनाला दिशा मिळत नाही. त्यासाठी प्रत्येकाला जीवनात गुरु असणे महत्त्वाचे आहे. गुरुचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे असते. आई-वडिलांबरोबरच शिक्षक हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आदरतीर्थ सत्कार केला.

एकविसाव्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना काळ देखील बदलत चालला आहे सर्वांसमोर अनेक आव्हाने उभे आहेत. काळानुरूप प्रत्येकाने यापुढे वाटचाल करायला हवी. जीवन किती सुंदेर आहे त्यासाठी जीवनामध्ये आनंदी वातावरणात जीवन जगले पाहिजे. आपापसातील मतभेद दूर केले पाहिजेत. गुरुपौर्णिमेनिमित्त प्राचार्य, मुख्याध्यापक, व शिक्षकांनी यावेळी मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त मांडले. त्यामुळे जीवन जगत असताना गुरुला देखील अनन्य असे महत्त्व असते. त्याचा प्रत्येकाने स्वीकार केला पाहिजे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थांच्या सर्वच विद्यालयांमध्ये शिक्षण महर्षी विद्याभूषण आदरणीय दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्याही प्रतिमेचे आदरपूर्वक पूजन करून पुष्पांजली वाहिली. तसेच तालुक्यातील अन्य शिक्षण संस्थांच्या विद्यालयांमध्ये देखील गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करून गुरु शिष्याचे महत्व यावेळी विशद करण्यात आले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी