राजेंद्र प्रसाद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,04-07-2023

राजेंद्र प्रसाद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात पारगाव सुद्रिक येथील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर या होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान केला.

याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी कुमारी अमृता जगताप, समीक्षा आल्हाट, अक्षरा रेपाळे, यश हिरवे, आर्यन मोटे, मंगेश वाडगे, कार्तिक जगताप आणि सार्थक हिरवे आदी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे किती पवित्र महत्त्व असते याविषयी सविस्तर भाषणे झाली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी कार्तिक जगताप म्हणाला की, रामायण आपणास कसे जगावे हे शिकविते, महाभारत आपणास कसे वागू नये हे शिकवते, गुरु शिष्यांच्या विषयी समर्पक अशी जोड्यांची नावे कार्तिकने यावेळी सांगितले.

विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके यांनी मनोगतामध्ये गुरु शिष्याचे महत्त्व यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून देत त्यांनी नालंदा विद्यापीठाची माहिती देत कर्ण व मच्छिंद्रनाथ यांच्या विषयी माहिती यावेळी विशद केली.

उपशिक्षिका श्रीमती जठार मॅडम यांनी पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती सांगताना गुरुने दिलेल्या मार्गावरती चालावे असा उपदेश केला.

श्रीमती शितोळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, स्वार्थी वृत्तीने केलेले कोणतेही मोठे काम कायमच लहान असते व निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान काम नेहमी मोठेच असते असे सांगितले.

अध्यक्षीय मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर यावेळी म्हणाल्या की, विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये बदलत्या काळात बदल कसा करावा याचे धडे विद्यार्थ्यांना देत आपल्या भारतीय संस्कृती विषयी त्यांनी माहिती देताना विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याविषयी मार्गदर्शन करत आपल्या आई- वडिलांचा आदर करावा हे सुतवाच्य त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. आभार विद्यार्थी कार्तिक घोडके यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.