वांगदरी गावात विद्यार्थ्यांनी घडवले वारकरी संस्कृतीचे दर्शन...!

By : Polticalface Team ,04-07-2023

वांगदरी गावात विद्यार्थ्यांनी घडवले वारकरी संस्कृतीचे दर्शन...!
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नवी वांगदरी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात बाल दिंडी सोहळा शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांच्या आयोजनाखाली पार पाडला. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण या बालदिंडीमध्ये माऊलींचा रथ, माऊलींचा अश्व, बैलगाडी रथ त्याचप्रमाणे या बालगोपाळांनी सर्व संतांची वेशभूषा साकारल्यामुळे सर्व गावातील वातावरणच अत्यंत भक्तीमय होऊन गेले होते. गावातील ग्रामस्थांनी दारोदारी या बाल संतांची पूजा अर्चा स्वागत सडा व रांगोळी काढून मोठ्या जल्लोषात स्वागत केले. दरम्यान बाल दिंडी स्वामी समर्थ मंदिरात गेल्यानंतर दिंडीचे स्वागत जी. प. महिला बालकल्याण च्या सभापती सौ अनुराधा नागवडे, गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे यांनी केले. गावातील मा.संजय काका नागवडे, मधुतात्या नागवडे, रामचंद्र गवळी, हनुमंत हराळ, व्यवस्थापन अध्यक्ष बंडोपंत सोनवणे, पांडुरंग जाधव, वीरेंद्र गोरे, दीपक दळवी, सचिन माने, सुधीर वांगणे, किरण जाधव, पांडा जाधव, शाहू काका राऊत, हेमंत नागवडे, तसेच सर्व ग्रामस्थ,भावीक, पालक व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. दिंडीचे आयोजक शिक्षक नेते आबासाहेब जगताप (राज्य सरचिटणीस) हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कला जोपासण्यासाठी नवनवीन उपक्रम घेत असतात. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी श्रीम.नलगे, श्रीम. शिर्के, श्रीम. गोरे, श्रीम. जठार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून हा वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर असा बालदिंडी सोहळा पार पाडला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी