श्रीगोंदा तालुक्यात संततधार पावसास प्रारंभ , शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज
By : Polticalface Team ,05-07-2023
प्रतिनिधी श्रीगोंदा: -
श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी 24 जून पासून आदरा नक्षत्राच्या संततधार पावसाने सर्वत्र प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाच्या मोठ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान रोहिणी आणि मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तब्बल एक महिना पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम रखडला गेला होता. त्यामध्ये पाणी पातळीतही कमालीची घट झाल्याने सर्वत्र पाण्याचा अगडोंब होताना दिसत होता. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागामध्ये महिला व पुरुषांची भटकंती सुरू होती. त्यामध्ये चालू वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आहे त्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत गेले. त्यामध्ये श्रीगोंदे तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड धरणाच्या पाण्याची पातळी देखील खालवली गेली. त्यामुळे घोड लाभक्षेत्रात ही पाण्याचा तुटवडा जाणू लागला. या लाभक्षेत्रात हिरवीगार शेतीला घर घर लागताना दिसत होती. चालू वर्षी गाळप हंगामाला जाणाऱ्या उसाचे देखील भवितव्य अंधकारमय होते. परंतु पांडुरंगाच्या कृपेने आषाढी एकादशीच्या पूर्वीच मेघराजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू दिसत आहेत.
श्रीगोंदे तालुका हा 75 टक्के सिंचन क्षेत्रात मोडतो. असे सिंचन क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामध्ये काही क्षेत्र घोड लाभक्षेत्रात तर तालुक्यातील अन्य क्षेत्र हे सिंचन क्षेत्रात मोडते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुकडी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामातील अखेरचे पाणी श्रीगोंदे तालुक्याचा मिळवताना सर्वांची श्रेधात्रिपट उडाली. शेतकरी आणि जलसिंचन विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष होताना दिसला. यामध्ये तब्बल एक महिना पाणी कर्जत करमाळाकडे त्यानंतर संघर्ष करीत शेतकऱ्यांना श्रीगोंद्याला सोडण्यात आले. अशी स्थिती अखेरच्या उन्हाळी हंगामातील आवर्तनाची दिसून आली. त्यामध्ये एक महिना श्रीगोंदेकरांच्या पायथ्यापासून जाणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल म्हणून कुकडीच्या कार्यकारी अभियंतांना आवर्तन मिळवण्यासाठी जलसमाधींच्या निर्णय घ्यावा लागला. अशा प्रकारचे निवेदन शेतकऱ्यांनी अखेरच्या आवर्तनासाठी कार्यकारी अभियंत्यांना दिले. लिंपणगाव शिवारात हे टोकाचे पाऊल शेतकऱ्यांनी उचलले. तेव्हा एका रात्रीत बंद झालेले आवर्तन पुन्हा कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सोडावे लागले. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब म्हणावे लागेल. कुकडी लाभ क्षेत्रात आवर्तनाचे ढिसाळ नियोजन त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना व फळबागांना मोठा फटका बसल्याचे शेतकरी सांगतात.
कारण उन्हाळी हंगामात शेवटचे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे असते. असो श्रीगोंदे तालुका हा संतांच्या पावनभूमीत पवित्र असा तालुका संबोधला जातो. त्यामध्ये आषाढ महिना सुरू झाला असल्याने काही दिवसांवर आषाढी एकादशी येत आहे. त्यामुळे संतांवर व पांडुरंगावर देखील तालुक्यातील जनतेची अपार श्रद्धा आहे. त्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील गावोगावी दिंड्या पंढरपूरकडे मोठा प्रमाणे प्रस्थान झालेले आहेत. संकट मोचन पांडुरंगाला वारकऱ्यांनी भरपूर पावसासाठी प्रार्थना केल्या. त्यामुळे अखेर पांडुरंगाच्या कृपेने 24 जून पासून मेघ राजाने सुरुवात केली असे वयोवृद्ध नागरिक सांगतात. उशिरा का होईना परंतु पावसाने उत्तम प्रकारे सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता खरीप हंगामासाठी पल्लवीत झालेले आहेत. शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवस पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी सेवा केंद्रामध्ये धाव घेऊन उत्कृष्ट बाजरी, कपाशी, मूग, उडीद इत्यादी पिकांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. पावसाने अशीच सतत कृपावृष्टी करावी अशा प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगाला तालुक्यातील वारकऱ्यांसह शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
वाचक क्रमांक :